विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – इंडियन मुजाहिदीन (आयएम) या दहशतवादी संघटनेचा संस्थापक यासीन भटकळ याला तिहार कारागृहात आयुर्वेदिक उपचार पुरविले जातील. त्याने तशी विनंती केली होती, जी कारागृह व्यवस्थापनाने मान्य केली. Yasin Bhatkhal wants ayuvedic treatment in jail
पोलिस महासंचालक (कारागृह) संदीप गोयल यांनी ही माहिती दिली. त्याला सांधेदुखीचा त्रास होत असल्याचेही त्यांनी सांगितले. पुण्यातील जर्मन बेकरी स्फोटासह यासीन हा दिल्ली, रांची, वाराणसी, मुंबई, हैदराबाद येथील स्फोटांचा सूत्रधार असल्याचा आरोप आहे.
२०१३ मध्ये त्याला नेपाळमध्ये अटक करण्यात आली. तिहारच्या क्रमांक दोनच्या कारागृहात यासीनला डांबण्यात आले आहे. छोटा राजन आणि तेहसीन अख्तर हे कुख्यात गुन्हेगार तेथेच आहेत. यासीनच्या अटकेनंतर तेहसीन हा आयएमचा म्होरक्या बनला होता.
Yasin Bhatkhal wants ayuvedic treatment in jail
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App