विशेष प्रतिनिधी
मुंबई : आरपीजी एंटरप्रायजेस या ख्यातनाम उद्योगाचे अध्यक्ष हर्ष गोयंका हे समाजमाध्यमांवर खूप सक्रिय असतात. आज त्यांनी एक वेगळीच पोस्ट शेअर केलीय… ही पोस्ट नव्हे; तर पत्र आहे, त्यांच्या एका कर्मचारयाच्या पत्नीचे. आणि ती पत्नी त्यांना अगदी तळमळून साकडे घालतेय… वर्क फ्राॅम आॅफिस चालू करा; नाहीतर आमचा विवाह नक्कीच टिकणार नाही! Harsh Goenka shares message from employee’s wife; She says allow work from office
त्या पत्नीचे पत्र सविस्तरपणे असे आहे :
“प्रिय सर,
तुमचा कर्मचारी मनोज याची मी पत्नी आहे. आता त्याला आॅफिसमधून काम करण्याची (वर्क फ्राॅम आॅफिस) परवानगी द्या, अशी माझी नम्र विनंती आहे. त्याने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि कोविड नियमांचे तो पालन करेल…
जर वर्क फ्राॅम होम असेच आणखी काही काळ चालू राहिले तर आमचे लग्न टिकूच शकणार नाही… तो दिवसभरांत दहा वेळा काॅफी ढोसतो, घरातल्या सगळ्या खोल्यांमध्ये लोळत राहतो, सगळीकडे अस्तावस्त करून टाकून उकीरडा केलाय, सतत खा -खा करत राहतो… कामाच्या वेळीसुद्धा घोरत पडतो… मला दोन मुले आहेत. त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे… माझे आयुष्य (संसार) पुन्हा रूळावर आणण्यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे…” “या पत्राला मी काय उत्तर देऊ?”, असा प्रश्न गोयंकांना पडलाय.
Don’t know how to respond to her….😀 pic.twitter.com/SuLFKzbCXy — Harsh Goenka (@hvgoenka) September 9, 2021
Don’t know how to respond to her….😀 pic.twitter.com/SuLFKzbCXy
— Harsh Goenka (@hvgoenka) September 9, 2021
लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षांपासून बहुतेक कंपन्यांमध्ये वर्क फ्राॅम होमच चालू आहे. सुरूवातीला अनेकांना बरे वाटले. आॅफिसला जाण्याची आणि वाहतूक जामपासून सुटका झाली, असेच अनेकांना वाटले. पण नंतर मात्र वर्क फ्राॅम होमचा जबरदस्त कंटाळा येऊ लागला आणि आता तर अनेकांना कोंडल्यासारखे वाटू लागले आहे.
आतापर्यंत नवरा बारा तास तरी बाहेर असायचा; पण आता २४ तास समोरच असल्याने घरातील बायकाही वैतागल्या आहेत. घरातील तुंबूंन पडलेल्या नवरोबांचे चोचले पुरविताना बायकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. यासंदर्भात अनेक मेम्सदेखील व्हायरल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर गोयंकांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्या कर्मचारयाच्या पत्नीने लाखो बायकांची “व्यथा” बोलून दाखविली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App