मोठी बातमी : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थळाचा दहा चौरस किमी परिसर तीर्थक्षेत्र म्हणून घोषित, मांस आणि मद्यविक्रीवर बंदी

Ten square kilometer area of ​​Shri Krishna birth place in Mathura declared pilgrimage site, meat and liquor banned

 ​​Shri Krishna birth place in Mathura : शुक्रवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील धार्मिक पर्यटन केंद्राबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरेतील भगवान कृष्णाच्या जन्मस्थळाचे दहा चौरस किलोमीटर क्षेत्र तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. Ten square kilometer area of ​​Shri Krishna birth place in Mathura declared pilgrimage site, meat and liquor banned


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : शुक्रवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील धार्मिक पर्यटन केंद्राबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरेतील भगवान कृष्णाच्या जन्मस्थळाचे दहा चौरस किलोमीटर क्षेत्र तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मथुरा भेटीच्या वेळी नागरिकांना दिलेले वचन आज पूर्ण केले आहे. त्यांच्या निर्देशानुसार, उत्तर प्रदेश सरकारने भगवान कृष्णाचे जन्मस्थान असलेल्या ब्रजमध्ये मांस आणि मद्यविक्रीवर बंदी घातली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही याबाबत एक ट्विट केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दहा चौरस किलोमीटर क्षेत्रातील एकूण 22 नगरपालिका वॉर्ड आणि क्षेत्र मथुरा-वृंदावनात श्रीकृष्ण जन्मस्थान केंद्रस्थानी ठेवून तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयाअंतर्गत आता येथे दहा किलोमीटर परिसरात दारू आणि मांस विकले जाणार नाही. या भागात मांस आणि दारू विक्रीवर बंदी घालण्याबाबत लवकरच आदेश जारी केला जाईल.

योगी आदित्यनाथ सरकारने दरवर्षी ब्रज प्रदेशात येणाऱ्या लाखो भाविकांच्या श्रद्धेच्या सन्मानार्थ हा निर्णय घेतला आहे. आता तीर्थक्षेत्र परिसरात दारू आणि मांस विक्री होणार नाही. त्यावर पूर्णपणे बंदी आहे. ब्रज येथे येणाऱ्या लाखो भाविकांचा विश्वास लक्षात घेऊन भाजप सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Ten square kilometer area of ​​Shri Krishna birth place in Mathura declared pilgrimage site, meat and liquor banned

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात