ममता सरकारचा छळ आणि धमक्यांमुळे संपादकाचा बंगाल सोडून दिल्लीत आश्रय; नुपूर शर्मा यांनी व्यक्त केल्या वेदना

Journalist Nupur J Sharma leaves Bengal due to harassment and threats by Mamata government

Journalist Nupur J Sharma : पश्चिम बंगाल निवडणुकांपासूनच तेथील हिंसाचार, जाळपोळ आणि आमनुष गुन्ह्यांच्या घटनांनी अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. याप्रकरणी अद्यापही तपास सुरू आहे. सीबीआयने हा तपास हाती घेतला आहे. तथापि, बंगालमध्ये केवळ सामान्य लोकांचाच नाही, तर पत्रकारांचाही छळ झाला हे आता समोर आले आहे. प्रसिद्ध संकेतस्थळ ऑप इंडियाचे संपादक नुपूर शर्मा यांनी या विषयाला वाचा फोडली आहे. Journalist Nupur J Sharma leaves Bengal due to harassment and threats by Mamata government


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल निवडणुकांपासूनच तेथील हिंसाचार, जाळपोळ आणि आमनुष गुन्ह्यांच्या घटनांनी अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. याप्रकरणी अद्यापही तपास सुरू आहे. सीबीआयने हा तपास हाती घेतला आहे. तथापि, बंगालमध्ये केवळ सामान्य लोकांचाच नाही, तर पत्रकारांचाही छळ झाला हे आता समोर आले आहे. प्रसिद्ध संकेतस्थळ ऑप इंडियाचे संपादक नुपूर शर्मा यांनी या विषयाला वाचा फोडली आहे.

नुपूर शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्यांना येणाऱ्या धमक्यांविषयी तसेच छळाविषयी माहिती दिली. शर्मा लिहितात की, ममता सरकारकडून गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या निष्ठूर छळानंतर आणि धमक्या मिळाल्यानंतर मी आता दिल्लीत स्थायिक होत आहे. सध्याच्या राजवटीत पश्चिम बंगालमध्ये राहणे अशक्य आहे. माझ्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी आणि पत्रकारितेचा धर्म वाचवण्यासाठी दशकांपासूनचे वास्तव्य असलेले माझे घर सोडणे गरजेचे बनले आहे. आमच्या बातम्यांची सत्यता शाबूत राखण्यासाठी मी कोणतीही तडजोड करणार नाही. मला खात्री आहे की, आमच्या वाचकांचा विश्वास आणि प्रेम यापुढेही आम्हाला बळ देत राहील.”

नुपूर शर्मा यांच्या या ट्वीटनंतर त्यांच्या समर्थनासाठी असंख्य प्रतिक्रिया आल्या आहेत. ममतांच्या राजवटीत पत्रकाराला असुरक्षित वाटत असल्याने अनेकांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, बंगाल सरकारची यावरील प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

Journalist Nupur J Sharma leaves Bengal due to harassment and threats by Mamata government

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात