विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया हा गजर आज सगळीकडेच ऐकू येतो आहे. राज्यात कोरोनाचं संकट असलं तरीही गणरायाची प्रतिष्ठापना आणि त्याबाबतचा उत्साह चांगलाच दिसून येतो आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच अनुषंगाने गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.PM Narendra Modi: The Prime Minister said in Marathi, ‘Happy Ganeshotsav …’
आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया! — Narendra Modi (@narendramodi) September 10, 2021
आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया!
— Narendra Modi (@narendramodi) September 10, 2021
आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया!”, असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.
देशभरातील गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आलेलं असतानाच दुसरीकडे करोनाचा धोका देखील कायम आहे. राज्यात करोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. मुंबईसह अन्य शहरांत दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ नोंदविण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात संसर्ग अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. तज्ञांकडून करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App