Pune Ganesh Utsav 2021: पुण्यातील मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना, गणेश मंडळांचा यंदाही ऑनलाईन कार्यक्रमावर भर


वृत्तसंस्था

पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्वच मानाच्या गणपती मंडळानी गणेशोत्सव सलग दुसऱ्या वर्षी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. मानाचे पाचही गणपतीची तसेच प्रमुख गणपती प्राणप्रतिष्ठापना आज झाली आहे.प्रतिष्ठापनेआधी मिरवणुका काढल्या गेलेल्या नाहीत. गणपतीचे दर्शन भक्तांना ऑनलाईन घेता येणार आहे.Installation of Mana Ganpatis in Pune, emphasis on online programs of Ganesh Mandals again this year

कसबा गणपती मानाचा पहिला गणपती

श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठा सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते झाली आहे. मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परंपरेप्रमाणे श्रींची मूर्ती पालखीतून उत्सव मंडपात आणण्यात आली. मंडळाच्या फेसबुक पेजवर दर्शन आणि लाईव्ह कार्यक्रम दाखवला गेला.



मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी

या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची मूर्तीची प्रतिष्ठापना सकाळी साडे अकरा वाजता वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांच्या हस्ते आणि सनई-चौघडाच्या सुरावटीत झाली. फेसबुक फेजवरून भक्तांना दर्शन घेता आले आहे.

मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम

गुरुजी तालीम मंडळाच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते दुपारी एक वाजता झाली. यंदा मंडळाने सामाजिक उपक्रमांवर अधिक भर दिला आहे.उत्सव मूर्तीचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने मंडळाच्या फेसबुक पेजवर याचे दर्शन होणार आहे.

मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती

तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना उद्योजक युवराज ढमाले यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता झाली.मंदिराभोवती घंटी महालाची आकर्षण सजावट सरपाले बंधूनी साकारली आहे. गणेश याग मंत्रजागर, असे धार्मिक विधी झाले. गणरायाच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा यूट्यूब पेज वर प्रसारित झाला आहे.

मानाचा पाचवा केसरीवाडा

केसरीवाडा गणेशोत्सव मंडळाने परंपरेनुसार पालखीतून केसरीवाड्यात मूर्ती आणली. केसरी चे विश्वस्त डॉक्टर रोहित टिळक यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली.सनई चौघड्याच्या मंगलमय वातावरणात सर्व धार्मिक विधी झाला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठापना सकाळी १० वाजून २३ मिनिटांच्या मुहूर्तावर अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते झाली. गणेशोत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक आरास करण्यात येईल. ऋषीपंचमीचा ११ सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजता अथर्वशीर्ष पठण सोहळा ऑनलाइन होणार आहे.

दगडुशेठ गणपतीचे घ्या ऑनलाईन दर्शन :
www.dagdushethganpati.com भाऊ रंगारी गणपती भाऊ रंगारी गणपतीची स्थापना दुपारी साडेबारा वाजता प्रविण परदेशी यांच्या हस्ते झाली.

Installation of Mana Ganpatis in Pune, emphasis on online programs of Ganesh Mandals again this year

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात