नाशिक : विधान परिषद निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी सकट विरोधकांना नाही संधी त्यामुळे रोहित पवारांची निवडणूकच पुढे ढकलायची मागणी!!, हे राजकीय वास्तव आज समोर आले. पण प्रत्यक्षात रोहित पवारांनी वेगळेच कारण दाखवून निवडणूक पुढे ढकलायची मागणी केली.
– महायुतीला सगळी संधी
राज्यात 16 जागांसाठी विधानपरिषद निवडणूक आधीच जाहीर झाली आहे. या 16 जागांमध्ये 12 जागा, भाजपला चार जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला फक्त एक जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळायची शक्यता आहे. महायुतीच्या नेत्यांमध्ये या जागा संदर्भात वाटाघाटी सुरू आहेत. काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे मुळात संख्याबळच नसल्यामुळे यापैकी कुठल्याही पक्षाला विधान परिषद निवडणुकीत कुठली संधी उपलब्ध नाही. त्यांचा एकही आमदार निवडून येण्याची शक्यता नाही.
पण रोहित पवारांनी तशी कुठलीही कबुली न देता विधान परिषद निवडणूक पुढे ढकलायची मागणी केली. त्यासाठी त्यांनी देशातल्या टंचाई परिस्थितीचे, महागाईचे आणि घोडेबाजाराचे कारण पुढे केले. रोहित पवारांनी या संदर्भात ट्विट केले.
आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन तुटवडा निर्माण झाला असून दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे, पुण्यात तर जमावबंदीचे देखील आदेश लागू झाले आहेत. अशा स्थितीत विधानपरिषद निवडणूक घेण्याची गरज आहे का ? यावर विचार होणं गरजेचं आहे. असंही घोडेबाजार करूनच ह्या निवडणुका होणार… — Rohit Pawar (@RRPSpeaks) May 25, 2026
आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन तुटवडा निर्माण झाला असून दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे, पुण्यात तर जमावबंदीचे देखील आदेश लागू झाले आहेत. अशा स्थितीत विधानपरिषद निवडणूक घेण्याची गरज आहे का ? यावर विचार होणं गरजेचं आहे.
असंही घोडेबाजार करूनच ह्या निवडणुका होणार…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 25, 2026
– या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणाले :
आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन तुटवडा निर्माण झाला असून दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे, पुण्यात तर जमावबंदीचे देखील आदेश लागू झाले आहेत. अशा स्थितीत विधानपरिषद निवडणूक घेण्याची गरज आहे का? यावर विचार होणं गरजेचं आहे.
असंही घोडेबाजार करूनच ह्या निवडणुका होणार आहेत. रिसॉर्ट, पर्यटन, मतदारांचा घोडेबाजार यावर शेकडो कोटी खर्च होतील. त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्यातील बिकट परिस्थिती लक्षात घेत या निवडणुका पुढे ढकलायला हव्यात. निवडणुका पुढे गेल्यास या बिकट स्थितीत सरकारला सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल.
पण या ट्विटमध्ये रोहित पवारांनी विरोधकांना विधान परिषदेच्या निवडणुकीत एकही आमदार निवडून आणायची संधी नाही, याची कबुली मात्र दिली नाही. त्यांनी फक्त महागाई, टंचाई आणि घोडेबाजार ही कारणे पुढे केली. पण प्रत्यक्षात विरोधकांना नसलेल्या संधीचीच पोटदुखी रोहित पवारांच्या ट्विटमधून बाहेर आली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App