महाराष्ट्र शासन आणि ॲग्रेको इंडिया कंपनीचा सामंजस्य करार; ४०० कोटींची गुंतवणूक, १००० रोजगार निर्मिती!!

CM Fadanvis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे महाराष्ट्र शासन (उद्योग विभाग) आणि ॲग्रेको इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.Maharashtra Government and Aggreco India Company sign MoU; Investment of Rs 400 crores, creation of 1000 jobs!!

सामंजस्य कराराचे तपशील :

– ठिकाण : फुलगाव, पुणे

– प्रस्तावित गुंतवणूक : 10 वर्षांत सुमारे ₹400 कोटी

– रोजगार संधी: सुमारे 1000



या सामंजस्य कराराद्वारे कार्यक्षम ऊर्जा आणि शाश्वत तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजना विकसित करण्यावर भर दिला जाईल, तसेच विविध क्षेत्रांमध्ये ऊर्जा कार्यक्षमता वाढविणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि हवामान बदलांविरोधातील प्रतिकारक्षमता मजबूत करण्यासह राज्याच्या हवामान बदल कृती आराखड्याला पूरक ठरणाऱ्या शाश्वत ऊर्जा आणि तापमान नियंत्रण प्रणालींच्या प्रसारासाठी सहकार्य केले जाईल.

यावेळी समूह वाणिज्य संचालक आणि ॲग्रेको इंडियाचे संचालक सन्नी ठकरार, ग्रुप हेड ऑफ गव्हर्नमेंट रिलेशन्स स्टीफन रेआ, व्यवस्थापकीय संचालक ॲग्रेको इंडिया, राहुल खरे, हेड ऑफ प्रोक्युरमेंट अँड ग्लोबल सप्लाय, सुनील देशमुख, ट्रेड काउन्सिलर, ब्रिटिश हाय कमिशन, मार्क बिरेल, सिनियर ट्रेड ॲडव्हायझर – एनर्जी, ब्रिटिश हाय कमिशन, प्रतीक्षा क्षीरसागर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Maharashtra Government and Aggreco India Company sign MoU; Investment of Rs 400 crores, creation of 1000 jobs!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात