विशेष प्रतिनिधी
मुंबई : Amit Thackeray शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. अमितजींना माझ्या खूप-खूप शुभेच्छा, पण त्यांनी ‘मातोश्री’पासून जरा सांभाळून राहावे, असा खोचक सल्ला रामदास कदम यांनी दिला. या राजकीय टोलेबाजीसोबतच, सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरलेल्या एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबतही त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.Amit Thackeray
अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना रामदास कदम म्हणाले, अमितजींना मी खूप खूप शुभेच्छा देतो. पण त्यांनी ‘मातोश्री’ पासून जरा सांभाळून राहावे. आज आदित्य तुम्हाला शुभेच्छा द्यायला आले आहेत, भाऊ म्हणून त्यांनी शुभेच्छा दिल्या. पण हा भाऊ किती दिवस टिकेल हे पहावे लागेल. आदित्य ठाकरे निवडून आले, पण तुम्हाला त्यांनी पाडले. ‘मातोश्री’चे प्रचंड प्रेम आहे तुमच्यावर, असा खोचक टोला कदम यांनी लगावला आहे.Amit Thackeray
एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याविषयी बोलताना रामदास कदम म्हणाले, सत्ता चालवायची असेल तर दिल्लीला पैसे आणण्यासाठी जावं लागतं. शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, कष्टकऱ्यांचे प्रश्न असतात, उद्योजकांचेही काही प्रश्न असतात, त्यासाठी दिल्लीला जावं लागतं. मला माझ्या नेत्याचा अभिमान आहे, ते उत्कृष्ट काम करत आहेत, मराठी माणसाला ठेच लागेल असं कुठलंही काम त्यांच्याकडून होत नाही, म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो, ‘एकनाथजी आप आगे बढो, हम सब आपके साथ है’, असेही कदम यावेळी म्हणाले.
एकनाथ शिंदे नेहमीच दिल्लीला जातात- गिरीश महाजन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठले आहे. यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले, एकनाथ शिंदे हे नेहमीच दिल्लीला जात असतात. त्यांची काही इतर खाजगी कामे असतील. जागा वाटपासाठी ते दिल्लीला गेले असे समजण्याचे काही कारण नाही. विधान परिषदेच्या जागांसाठी उपमुख्यमंत्री दिल्लीला जातील असे मला वाटत नाही. मुख्यमंत्र्यांसोबत एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा पवार हे एकत्रित बसून त्या संदर्भात निर्णय घेतील, असे महाजन यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App