आकाशावर लक्ष ठेवण्यासाठी हवाई दलाला मिळणार सहा विमाने, अकरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाला सहा अत्याधुनिक विमाने घेण्यासाठी केंद्र सरकारने अकरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या विमानांमध्ये अत्याधुनिक रडार यंत्रणा असल्याने आकाशावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. शेकडो किलोमीटर क्षेत्रावर लक्ष ठेवणे त्यामुळे शक्य होणार आहे.The Air Force will get six aircraft to monitor the skies, a fund of Rs 11,000 crore has been sanctioned

विमान स्वत: एअर इंडियाचे हँड-मी-डाउन ए -321 जेटलाइनर असण्याची शक्यता आहे. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाने (डीआरडीओ) विकसित केलेली मेड-इन-इंडिया रडार वाहून नेण्यासाठी त्यामध्ये संरचनात्मक बदल केले जातील. डीआरडीओ रडार हवाई दलाने दोन नेत्रा एअरबोर्न विमानांवर डीआरडीओचे अत्याधुनिक रडार बसविले आहे.भारतीय हवाई दलाकडे सध्या रशियाकडून खरेदी केलेली ए-५० ही विमाने आहेत. त्यावर इस्त्रायलची फाल्कन ही रडार यंत्रणा बसविण्यात आली आहे. नव्याने घेण्यात येणाºया विमानांवर आता इलेक्ट्रॉनिकली स्कॅनड अ‍ॅरे सिस्टिम असलेला आणि कॉम्प्युटरने संचलित होणाºया रडारचाही वापर केला जाणार आहे.

यामुळे अ‍ॅटेंना न फिरविताही रडार यंत्रणा काम करू शकते. ही रडार यंत्रणा अधिक अचूक, अधिक विश्वासार्ह आहेत . अ-321 विमानांवर बसविण्यता येणारी रडार यंत्रणा भारतीय हवाई दलाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. विमानाच्या सभोवतालच्या शेकडो किलोमीटरच्या हवाई क्षेत्राचे 360 डिग्रीने कव्हरेज यामुळे होऊ शकणार आहे.

27 फेब्रुवारी 2019 रोजी भारताने केलेल्या एअर स्ट्राईकच्या वेळी नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर एअरबोर्न वॉर्निंग एअरक्राफ्ट यंत्रणेचा उपयोग दिसून आला होता. यावेळी भारतीय विमानांना हवाई दलाच्या नेत्रा विमानांचा फशयदा झाला होता. त्यामुळे पाकिस्तानचा प्रतिहल्लाही परतावून लावणे शक्य झाले होते. त्यामुळे शत्रुच्या सैनिकांच्या हालचालींचा आढावा घेणेही शक्य झाले होते.

विंग कमांडर वर्धमान यांनी त्यांचे विमान पडण्यापूर्वी पाकिस्तानचे एक एफ-१६ विमान पाडले होते. नेत्रा विमानाकडून मिळालेल्या माहितीवरूनच वर्धमान यांना हा हल्ला करणे शक्य झाले होते. चार वर्षांत पहिले विमान हवाई दलात दाखल होणार आहे. त्यानंतर सगळी विमाने सामील होण्यासाठी सात वर्षे लागणार आहेत.

The Air Force will get six aircraft to monitor the skies, a fund of Rs 11,000 crore has been sanctioned

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण