मायावतींनी आत्तापर्यंत पोसलेले गुंड आता चालले ओवैसींच्या आश्रयाला; आधी अतिक अहमद, आता मुख्तार अन्सारीला ऑफर


वृत्तसंस्था

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधी आपल्या बहुजन समाज पक्षाची साफसफाई करताना माजी मुख्यमंत्री मायावती यांनी अतिक अहमद आणि मुख्तार अन्सारी या गुंडांना माफियांना तिकीट देण्याचे नाकारले त्याबरोबर असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाने त्यांना चुचकारले आहे. अतिक अहमद यांची पत्नी शाइस्ता पर्वीन परवीन हिला असदुद्दीन ओवैसी यांनी आयएमआयएम पक्षाचे सदस्यत्व बहाल केले आहे, तर आता मुख्तार अन्सारी याला देखील त्यांनी पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. AIMIM Offers Party Ticket To Mukhtar Ansari by his choice

मायावतींना बहुजन समाज पक्षाची प्रतिमा सुधारायची आहे म्हणून त्या माफियांना 2022 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊ इच्छित नाहीत. मायावतींनी मुख्तार अन्सारी याला उमेदवारी देणार नसल्याचे जाहीर केल्याबरोबर आहे. आता ओवैसी यांच्या एआयएमआयएमने अन्सारीला खुली ऑफर दिली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपा, समाजवादी पार्टी, बसपा आणि काँग्रेसनं आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मायावतींच्या बहुजन समाज पार्टीनं आपल्या पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी माफियांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मायावतींनी मुख्तार अन्सारी यांना उमेदवारी देणार नसल्याचे जाहीर केले आहे. यानंतर आता ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षानं अन्सारी यांना खुली ऑफर दिली अहे. त्यांना पक्षाची दारे खुली आहेत, असे एआयएमआयएमकडून सांगण्यात आले आहे.



“मुख्तार अन्सारी उत्तर प्रदेशच्या ज्या जागेवरून लढू इच्छितात. तेथून ते पार्टीचे तिकीट घेऊ शकतात”, असं एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी आज तकशी बोलताना सांगितले आहे. ओवैसी सध्या मिशन उत्तर प्रदेशासाठी रणनीती आखत आहेत. या रणनीती अंतर्गत या महिन्याच्या २२, २५, २६ आणि ३० तारखेला उत्तर प्रदेश दौऱ्यावर असणार आहेत. २२ सप्टेंबरला संभल, २५ सप्टेंबरला प्रयागराज, २६ सप्टेंबरला कानपूर आणि ३० ऑक्टोबरला बहरायच दौरा करणार आहेत.

बीएसपी का अगामी यूपी विधानसभा आमचुनाव में प्रयास होगा कि किसी भी बाहुबली व माफिया आदि को पार्टी से चुनाव न लड़ाया जाए। इसके मद्देनजर ही आजमगढ़ मण्डल की मऊ विधानसभा सीट से अब मुख्तार अंसारी का नहीं बल्कि यूपी के बीएसपी स्टेट अध्यक्ष श्री भीम राजभर के नाम को फाइनल किया गया है।

“आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही माफियाला पक्षाचे तिकीट मिळणार नाही, यासाठी आमचा प्रयत्न आहे. यासाठी उत्तर प्रदेशातील आझमगड विधानसभा मतदारसंघातून मुख्तार अन्सारी ऐवजी बसपा प्रदेशाध्यक्ष भीम राजभर यांना तिकीट देण्याचे निश्चित केले आहे”, असे ट्विट मायावती यांनी केले आहे. मायावती यांनी पक्ष प्रभारींना उमेदवारांची निवड करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सरकार स्थापन केल्यानंतर अशा घटकांवर कठोर कारवाई करताना कोणतीच अडचण नको, म्हणून त्यांनी पक्षातील नेत्यांना ताकीद दिली आहे.

दुसरीकडे, बांदा तुरुंगात बंद असलेले आमदार मुख्तार अन्सारीच्या मोठ्या भावाने समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. तेव्हापासून मायावती नाराज असल्याचे बोलले जात आहे. मुख्तार अन्सारी मागील विधानसभा निवडणूक बसपाच्या तिकीटावर जिंकला होता. तर त्यांचा भाऊ अफजल अन्सारी २०१९ मध्ये गाजीपूरमधून बसपाच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आला आहे.

AIMIM Offers Party Ticket To Mukhtar Ansari by his choice

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात