लस न घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर पंजाब सरकारचा बडगा, 15 सप्टेंबरनंतर सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश

Compulsory Leave For Punjab Govt Employees If Even One Covid Vaccine Dose Not Taken

Covid Vaccine : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी जाहीर केले की, ज्या कर्मचाऱ्यांना आरोग्याव्यतिरिक्त इतर कारणांमुळे कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला नाही, त्यांना 15 सप्टेंबरपासून सक्तीच्या रजेवर पाठवले जाईल. पंजाबमधील लोकांना संसर्गापासून वाचवण्यासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी हे कठोर पाऊल उचलले आहे. Compulsory Leave For Punjab Govt Employees If Even One Covid Vaccine Dose Not Taken


वृत्तसंस्था

चंदिगड : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी जाहीर केले की, ज्या कर्मचाऱ्यांना आरोग्याव्यतिरिक्त इतर कारणांमुळे कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला नाही, त्यांना 15 सप्टेंबरपासून सक्तीच्या रजेवर पाठवले जाईल. पंजाबमधील लोकांना संसर्गापासून वाचवण्यासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी हे कठोर पाऊल उचलले आहे.

ज्या कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या कोणत्याही कारणामुळे कोरोनाची लस मिळाली नाही, त्यांना यातून दिलासा देण्यात आला आहे. त्याचवेळी, उर्वरित कर्मचाऱ्यांना 15 सप्टेंबरपर्यंत लस घ्यावी लागेल. जर एखाद्या कर्मचाऱ्याने 15 सप्टेंबरपर्यंत लस घेतली नाही तर त्याला सक्तीने रजेवर पाठवले जाईल. जोपर्यंत ते लसीचा पहिला डोस घेत नाहीत, तोपर्यंत ही रजा सुरू राहील.

शुक्रवारी झालेल्या उच्चस्तरीय व्हर्च्युअल कोविड आढावा बैठकीत मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, विश्लेषणाच्या आकडेवारीमध्ये लसीची प्रभाव स्पष्ट झाला आहे. ते म्हणाले की, सरकारी कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत, परंतु जे लस घेणे टाळत आहेत त्यांना आता पहिला डोस घेईपर्यंत रजेवर जाण्यास सांगितले जाईल.

Compulsory Leave For Punjab Govt Employees If Even One Covid Vaccine Dose Not Taken

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण