Nobel Literature Prize : नॉर्वेजियन लेखक जॉन फॉसे यांना यंदाचा साहित्य नोबेल पुरस्कार जाहीर


जाणून घ्या, या पुरस्कारासाठी  का करण्यात आली निवड?

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  यंदा साहित्यातील नोबेल पारितोषिक नॉर्वेजियन लेखक जॉन फॉस यांना देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.  त्यांच्या अप्रतिम नाटकांसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. स्वीडिश अकादमीने ही माहिती दिली. अकादमीचे स्थायी सचिव मॅट्स माल्म यांनी स्टॉकहोममध्ये पुरस्काराची घोषणा केली. Norwegian writer John Fosse has been awarded this years Nobel Prize for Literature

स्वीडिश संशोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या  इच्छेनुसार, नोबेल पारितोषिकांमध्ये 1.1 दशलक्ष स्वीडिश क्रोनर (10 लाख डॉलर) रोख पारितोषिक असते. डिसेंबरमध्ये होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात विजेत्यांना 18 कॅरेटचे सुवर्णपदक आणि डिप्लोमाही दिला जाईल. मागील वर्षी फ्रेंच लेखिका एरनॉक्स यांना हा पुरस्कार मिळाला होता. एरनॉक्स या 119 नोबेल साहित्य पुरस्कार विजेत्यांपैकी केवळ 17व्या महिला होत्या.

Nobel Prize 2023 : कोविड लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञांना मिळाले ‘नोबेल पारितोषिक’

तर कोविड-19 जागतिक महामारी  थांबवण्यासाठी mRNA लस विकसित करणारे शास्त्रज्ञ कॅटालिन कारिको आणि ड्र्यू वेसमन यांना मेडिसनचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. या लसीच्या माध्यमातून या दोन शास्त्रज्ञांनी संपूर्ण जगाची विचारसरणीच बदलून टाकली. तर जगभरातील शास्त्रज्ञ शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीच्या क्रिया आणि प्रतिक्रियांबद्दल अधिक समजून घेऊ शकले.

Norwegian writer John Fosse has been awarded this years Nobel Prize for Literature

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात