सुपरस्टार राम चरण याच्या 41 दिवसाच्या व्रताची सांगता!

Superstar Ram Charan

  • अनवाणी राहिलेल्या राम चरणने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन!

विशेष प्रतिनिधी 

पुणे : सुपरस्टार राम चरण हा अनेकदा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. त्याने आपल्या अभिनयाने मनोरंजन विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाच्या यशानंतर राम चरण जगभर प्रसिद्ध झाला आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. त्यातच तो त्याच्या एअरपोर्ट लूकमुळे देखील चर्चेत आला होता. आता राम चरणने सिद्धिविनायक मंदिराला भेट देत बाप्पाचे दर्शन घेतले आहे. यावेळी त्याच्यासोबत शिवसेना नेते राहुल कनाल देखील होते. Superstar Ram Charan’s 41-day fast ends

तो काळा कुर्ता-पायजमा घालून अनवाणी चालत असताना मंगळवारी संध्याकाळी मुंबई विमानतळावर दिसला होता. त्यानंतर त्याने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. मात्र त्याला पाहण्यासाठी मंदिराबाहेर त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. त्याच्या 41 दिवसांच्या अयप्पा दीक्षेची सांगता झाली. असे बोलले जात आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचे बरेच व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे. त्याला भेटण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. मंगळवारी देखील राम चरणला हैदराबाद विमानतळावर स्पॉट केले होते. यावेळी त्याने कपाळावर टिळा लावला होता आणि काळा कुर्ता-पायजमा घालून तो देसी लूकमध्ये दिसला. यावेळी राम चरण अनवाणी पायांनी चालतांना दिसला. त्याने पायात चप्पल किंवा शूज काहीही घातलेलं नव्हतं.

राम चरण 41 दिवसांचा कडक उपवास करत आहेत. तो दरवर्षी अय्यप्पाची दीक्षा घेतो. दक्षिण भारतात अयप्पा दीक्षा नावाची परंपरा आहे. जी 41 दिवस चालते, जेथे भगवान अय्यप्पाचे भक्त तीन महीने विलासी जीवनशैलीपासून दूर राहतात आणि सात्त्विक जीवन जगतात. या काळात ते 41 दिवस काळे वस्त्र परिधान करतात.

याकाळात ते मांसाहार करू शकत नाही, दाढी किंवा केस कापू शकत नाही. एवढेच नाही तर त्यांना 41 दिवस जमिनीवर झोपावे लागते. या दिवसात ते पायात काहीच घातल नाहीत, अणवाणी पायानेच फिरतात. राम चरण देखील या परंपरेचे पालन करतांना दिसला. आज त्याच्या या 41 दिवसाच्या उपवासाची सांगता झाली

Superstar Ram Charan’s 41-day fast ends

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात