भीषण अपघातात गायत्री जोशी पतीसह गंभीर जखमी तर एका स्विस दाम्पत्याचा मृत्यू
विशेष प्रतिनिधी
इटली : स्वदेस या हिंदी चित्रपटात अभिनेता शाहरुख खान सोबत मुख्य भूमिका साकरलेली सुंदर अभिनेत्री गायत्री जोशी हिच्या कारला इटलीमध्ये भीषण अपघात झाला आहे. यावेळी ती पती विकास ओबेरॉय सोबत होती, ते दोघेही गंभीर जखमी झाले आहेत, तर या भीषण अपघातात एका स्विस जोडप्याचा मृत्यू झाला आहे. Swades fame Bollywood actress Gayatri Joshis car met with a terrible accident in Italy
प्राप्त माहितीनुसार, हा भीषण रस्ते अपघात घडला त्यावेळी गायत्री जोशी पती विकास ओबेरॉयसह निळ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनी कारमधून जात होती. तर त्याच मार्गावर अन्य वाहने देखील वेगाने धावत होती. दरम्यान एका गाडीने ट्रकला ओव्हरेटक करतेवेळी त्यांच्या कारला धडक दिली. त्यानंतर तो ट्रक रस्त्यावर उलटला त्यामुळे त्याच्या समोर असलेल्या फरारी कारला धडक बसून तिने पेट घेतल्याने त्यातील स्विस जोडप्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
Two deaths on a Ferrari in Sardina, Italy pic.twitter.com/skT3CaXg0T — Globe Clips (@globeclip) October 3, 2023
Two deaths on a Ferrari in Sardina, Italy pic.twitter.com/skT3CaXg0T
— Globe Clips (@globeclip) October 3, 2023
हा भीषण अपघात इटलीमधील सार्डिनिया भागात घडल्याची माहिती समोर आली आहे. तर, गायत्रीने या अपघातानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ती व तिचा पती सुखरूप असल्याचे माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App