Earthquake In Nepal : नेपाळमध्ये जोरदार भूकंपामुळे कोसळल्या इमारती, विध्वंसाचे चित्र आले समोर


स्थानिक प्रशासनाचे पथक ढिगाऱ्यातून दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नेपाळ आणि उत्तर भारतात मंगळवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता. नेपाळची भूमी एक-दोनदा नव्हे तर चार वेळा हादरली आहे. रिश्टर स्केलनुसार त्याची सर्वाधिक तीव्रता 6.2 इतकी नोंदवण्यात आली आहे. Earthquake In Nepal Buildings collapsed due to a strong earthquake in Nepal

नेपाळमध्ये अनेक इमारती कोसळल्या आहेत, तर अनेक लोक इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेले आहेत. या भूकंपाचा परिणाम दिल्ली एनसीआरसह देशातील काही राज्यांमध्ये दिसून आला आहे.

नेपाळमध्ये जमीन हादरताच लोक घराबाहेर पडले आणि मोकळ्या  जागेवर  आले. वारंवार होणाऱ्या भूकंपांमुळे लोक घाबरले आहेत. भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की नेपाळमधील बझांगमध्ये अनेक इमारती कोसळल्या. अनेक जण इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. स्थानिक प्रशासनाचे पथक ढिगाऱ्यातून दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र, हे वृत्त लिहेपर्यंत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Earthquake In Nepal Buildings collapsed due to a strong earthquake in Nepal

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात