PM मोदी 2 दिवसांत दुसऱ्यांदा तेलंगणा-छत्तीसगडला भेट देणार; दोन्ही राज्यांत 31,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 ऑक्टोबरला तेलंगणा आणि छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दोन दिवसांतील त्यांचा हा दुसरा दौरा असेल. PM मोदी सकाळी 11 वाजता जगदलपूर, बस्तर येथे पोहोचतील आणि 23,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी करतील. यामध्ये नगरनारच्या एनएमडीसी स्टील प्लांटचा समावेश आहे.PM Modi to visit Telangana-Chhattisgarh for second time in 2 days; Inauguration and foundation laying of projects worth Rs 31,800 crore in both states

दुपारी 3 वाजता, पंतप्रधान तेलंगणातील निजामाबाद येथे पोहोचतील, जेथे ते वीज, रेल्वे आणि आरोग्य यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील सुमारे 8000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. याठिकाणी ते भाजपच्या सभेलाही संबोधित करणार आहेत.दोन दिवसांपूर्वी महबूबनगर येथून निवडणूक प्रचाराला सुरुवात

दोन दिवसांपूर्वी पीएम मोदींनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महबूबनगर येथून भाजपच्या प्रचाराची सुरुवात केली होती. निजामाबादला राजकीय महत्त्व आहे कारण के. कविता या मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या आणि विद्यमान बीआरएस एमएलसी, येथून पुन्हा 2024 च्या निवडणुका लढवण्याची अपेक्षा आहे. तथापि, के. कविता यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निजामाबादचे विद्यमान भाजप खासदार डी. अरविंद यांच्याकडून पराभव झाला होता.

तेलंगणात या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन

NTPC च्या तेलंगणा सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाच्या फेज-I च्या पहिल्या 800 मेगावॅट युनिटचे उद्घाटन करतील. याशिवाय ते मनोहराबाद आणि सिद्धीपेठ यांना जोडणाऱ्या नवीन मार्गाचे आणि धर्माबाद-मनोहराबाद आणि महबूबनगर-कुरनूल दरम्यानच्या रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटनही करणार आहेत.

PM Modi to visit Telangana-Chhattisgarh for second time in 2 days; Inauguration and foundation laying of projects worth Rs 31,800 crore in both states

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात