पक्ष सोडून उभा राहिलो, तर डिपॉझिटही जाईल; फडणवीसांचे वक्तव्य; पण इशारा कोणाला??


विशेष प्रतिनिधी

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल भाजप केंद्रीय निवडणूक मंडळाच्या बैठकीला नवी दिल्लीत उपस्थित राहिले आणि आज सायंकाळी दादरमध्ये त्यांनी भाजप लोकसभा आणि विधानसभा विस्तारकांच्या बैठकीत महत्त्वपूर्ण भाषण केले. If you leave the party and stand, the deposit will also go : fadnavis

महाराष्ट्रात भाजपबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पक्ष आले असले तरी “बॉस” भाजपच असेल आणि शिवसेना राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे जबाबदारी देखील भाजपचीच असेल असे महत्त्वपूर्ण वक्तव्य त्यांनी केले.

याचा अर्थ भाजप फक्त “बॉसगिरी” करेल असे नाही, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारीही भाजप घेईल, असे फडणवीसांच्या वक्तव्यातून असा “पॉलिटिकल मेसेज” फडणवीस यांच्या वक्तव्यातून त्या पक्षाच्या नेत्यांना गेला आहे.

पण त्या पलीकडे जाऊन एक अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य फडणवीस यांनी केले, ते म्हणजे आधी पक्ष, नंतर मी असा विचार नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. मी जर पक्ष सोडून उभा राहिलो, तर माझे डिपॉझिट ही जप्त होईल, असे फडणवीस यांनी व्यक्तव्य केले.

या वक्तव्याला महाराष्ट्रातील भाजपच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. आधी राष्ट्र – मग पक्ष आणि सगळ्यात शेवटी व्यक्ती हे भाजपचे सूत्र आहेच, पण पक्षाचा प्रत्येक नेता आणि कार्यकर्त्याच्या कार्यकर्ता तसे मानूनच चालतो असा राजकीय व्यवहार सध्या दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपचे काही नेते वेगळा सूर काढत असल्याचे माध्यमांच्या बातम्यांमधून दिसून येते. काही नेते स्वतंत्रपणे कुठली यात्रा काढतात. पक्षात नाराज असल्याच्या बातम्या येतात. त्या नाराजीला पुष्टी देणारी त्यांची काही वक्तव्ये देखील माध्यमांमधून पुढे येतात.

या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याला विशेष महत्त्व आहे. भाजपमध्ये “अतिस्वतंत्र” विचार करून चालणार नाही. कोणी पक्ष सोडून जाणार असेल, तर त्याला कोणी हरकत घेणार नाही. पण डिपॉझिट जाऊ शकते, हा गंभीर इशारा फडणवीसांच्या वक्तव्यातून पुढे आला आहे.

आता या इशाऱ्याबाबत महाराष्ट्रातील भाजपचे नेते नेमका काय विचार करतात आणि कसा प्रतिसाद देतात??, हे पाहणे भाजपचा पक्ष म्हणून विचार करण्यापेक्षा त्या नेत्यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टिकोनातून अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.

If you leave the party and stand, the deposit will also go : fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात