महाराष्ट्रात भाजपच “बॉस” त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी निवडून आणण्याची जबाबदारी ही भाजपचीच; देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य


प्रतिनिधी

मुंबई :  शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत आले तरी महाराष्ट्रात भाजपच “बॉस” आहे त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारीही भाजपचीच असेल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची बातमी आहे. BJP is the boss in Maharashtra, so it is the responsibility of BJP to elect Shiv Sena NCP

भाजपची दादर येथे आज महत्त्वाची बैठक झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत भाजपच्या लोकसभा आणि विधानसभा विस्तारकांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी विस्तारकांना महत्त्वाचे आदेश दिले. तसेच राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आपल्यासोबत सत्तेत सहभागी असले तरी महाराष्ट्रात भाजपच बॉस आहे, असे मोठे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विशेष म्हणजे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना, तीन पक्षांचा एकत्रित सरकार असताना भाजप हाच बॉस असल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य आगामी काळात खरंच महाराष्ट्राच्या राजकारणात परिणामकारक ठरतं का? ते पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तारकांना यावेळी महत्त्वाचे आदेश देखील दिले आहेत. स्वतः साठी 10 तास, तर पक्षासाठी 14 तास द्या. गाव, तालुका, जिल्हा पातळीवरील प्रभावित व्यक्तींना संपर्क करा, असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी विस्तारकांना दिले. तसेच फडणवीस यांनी विस्तारकांना पुढील एका वर्षाचा रोडमॅप तयार करण्याच्या सूचना दिल्या. यातून भाजपकडून निवडणूक जिंकण्यासाठी ग्राम पातळीवर मायक्रो प्लानिंग करण्यात येत असल्याचं दिसत आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

आपल्यासोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आले असले, तरी राज्यात भाजप ईज ऑल्वेज बॉस आहे. युती मधील सर्व पक्षांमध्ये समन्वय साधत त्यांचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे. पक्ष प्रथम आणि मी शेवटी आहे. मी इथं उभा आहे तो पक्षामुळेच. मी पक्ष सोडून उभा राहिलो, तर माझेही डिपॉझिट जप्त होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम विस्तारकांना करायचे आहे. राज्यात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असल्याने राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवारांना सुद्धा निवडून आणायची जबाबदारी आपल्यावर असेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

BJP is the boss in Maharashtra, so it is the responsibility of BJP to elect Shiv Sena NCP

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात