वंदे भारत ट्रेन सुरू होऊन केवळ दहा दिवस झाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजस्थानमधील उदारपूर जिल्ह्यात सोमवारी सुदैवाने मोठा रेल्वे अपघात टळला. हा अपघात नुकत्याच सुरू झालेल्या वंदे भारत ट्रेनचा घडला असता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 सप्टेंबर रोजी उदयपूर-जयपूरसाठी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर 24 सप्टेंबरपासून वंदे भारत एक्सप्रेस उदयपूर मार्गावर सतत धावत आहे. वंदे भारत ट्रेन सोमवारी जयपूरहून उदयपूरच्या दिशेने परतत होती. त्यावेळी रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात दगड आणि लोखंडी रॉड ठेवण्यात आल्याचे आढळून आले. हे वंदे भारत ट्रेनला रुळावरून खाली उतरवण्याचे षडयंत्र होते. Rajasthan Conspiracy to derail Vande Bharat stones and iron bars spotted on track
वंदे भारत ट्रेन सुरू होऊन केवळ दहा दिवस झाले आहेत. तर वंदे भारत ट्रेन मोठ्या अपघाताची शिकार होण्यापासून वाचण्याची ही तिसरी वेळ आहे. चाचणी सुरू असताना या ट्रेनला जनावरे धडकली होती. यादरम्यान ट्रेनच्या पुढील भागाचे नुकसान झाले होते. दोन दिवसांनी रेल्वेच्या बोगीतील काच फुटली होती. यावेळी रेल्वेला रुळावरून घसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. रुळांवर दगड आणि लोखंडी रॉड टाकून ट्रेन रुळावरून उतरवण्याचे षडयंत्र होते.
वंदे भारत एक्सप्रेस सोमवारी सकाळी उदयपूरहून निघाली. जी सकाळी ९.५५ वाजता मावळी-चितौडगडमार्गे गांगरातून जाणार होती. पुढे, सोनियाना स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकवर दगड आणि लोखंडी रॉड सापडले. यावर ट्रेन धावली, मात्र रेल्वे चालकाच्या शहाणपणामुळे थोड्या अंतरावर धावून ट्रेन लगेच थांबवण्यात आली. खाली उतरल्यावर रुळावर लोखंडी रॉड आणि दगड पडलेले दिसले.
Bihar Caste Survey : बिहार सरकारने जारी केला जात जनगणना अहवाल, मागासवर्गीय 27.1 टक्के
यावेळी रेल्वे पोलीसही दाखल झाले. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ट्रॅकवर दगड आणि लोखंडी सळ्या कोणी ठेवल्या होत्या? याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात व्यस्त आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जो कोणी दोषी आढळला त्याच्यावर मोठी कारवाई केली जाईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more