”हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीनंतर केसीआर दिल्लीत मला भेटायला आले आणि…” असंही मोदींनी सांगितलं.
विशेष प्रतिनिधी
निजामाबाद : यावर्षी देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजपाने आपली ताकद पणाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तेलंगणातील निजामाबाद येथे सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना टोमणे मारले आहेत. मोदी म्हणाले की ”केसीआर यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील व्हायचे होते, परंतु मी नकार दिला.” KCR should have joined NDA Prime Minister Modi
मोदी म्हणाले की, दिल्लीत आल्यानंतर केसीआर यांनी एनडीएचा भाग होण्याची इच्छा व्यक्त केली होती. ते म्हणाले- ‘हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने ४८ जागा जिंकल्या तेव्हा केसीआरला पाठिंब्याची गरज होती. या निवडणुकीपूर्वी ते विमानतळावर माझे स्वागत करायला यायचे, पण नंतर अचानक त्यांनी तसे करणे बंद केले. हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीनंतर केसीआर दिल्लीत मला भेटायला आले आणि त्यांनी एनडीएमध्ये सामील व्हायचे असल्याचे सांगितले. मी केसीआरला सांगितले की तुमची कृती अशी आहे की मोदी तुमच्याशी संबंध जोडू शकत नाही.
छत्तीसगडमध्ये मोदींनी राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानावरून काँग्रेसवर साधला निशाणा, म्हणाले…
मोदींनी तेलंगणातील सत्ताधारी भारत राष्ट्र समिती प्रमुख आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यांनी असा दावा केला की एका बैठकीदरम्यान केसीआर यांनी त्यांना तेलंगणाची सत्ता त्यांचा मुलगा आणि बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामाराव यांच्याकडे सोपवायची असल्याचे सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more