शरद पवारांचे आणखी एक नॅरेटिव्ह फडणवीसांकडून उद्ध्वस्त; राष्ट्रपती शासन उठविण्यात नव्हे; लावण्यातच पवारांचा हात!!

Another narrative of Sharad Pawar destroyed by Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी घेतलेल्या शपथविधीचे पडसाद आजही महाराष्ट्रात उमटतात. आज इंडिया टुडे कन्क्लेव्ह मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मुलाखतीतून शरद पवारांचे आणखी एक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त करून टाकले. Another narrative of Sharad Pawar destroyed by Fadnavis

2019 मध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्रात लावलेले राष्ट्रपती शासन उठवण्यासाठीच शरद पवारांनी खेळी करून अजित पवारांना देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथ घ्यायला पाठवले. राष्ट्रपती राजवट उठविल्यानंतर त्यांचे काम झाले. त्यामुळे त्यांनी अजित पवारांना परत बोलावून उद्धव ठाकरेंबरोबर जाऊन सरकार बनविले, असे नॅरेटिव्ह खुद्द पवारांनी आणि त्यांच्या अनुयायांनी एस्टॅब्लिश केले, हेच नॅरेटिव्ह फडणवीस यांनी आज उद्ध्वस्त करून टाकले.

राष्ट्रपती शासन उठविण्यात नव्हे, तर राष्ट्रपती शासन लावण्यातच पवारांचा हात होता. कारण त्यांना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यापासून पासून दूर व्हायचे होते. त्यासाठी त्यांना वेळ हवा होता. म्हणून त्यांनीच महाराष्ट्रात राष्ट्रपती लावण्याची सूचना केली होती, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत केला.

2019 चे अर्धसत्य फडणवीस यांनी आधी सांगितल्यानंतर राष्ट्रवादी फूट पडण्याची राजकीय घडामोड घडली. त्यानंतरच अजित पवार शिंदे – फडणवीस सरकार मध्ये तिसऱ्या क्रमांकावर उपमुख्यमंत्री म्हणून आले.



आजच्या मुलाखतीत मी त्या अर्धसत्याच्या पलीकडे जाऊन सांगतो असे म्हणून देवेंद्र फडणवीसांनी उरलेल्या अर्धसत्यावरचा पडदा अर्धा उघडला आणि राष्ट्रपती राजवट लावण्यातच पवारांचा हात असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची शरद पवारांचीच सूचना होती. कारण त्यांनीच आपल्याला अचानक यू टर्न घेता येणार नाही. त्यासाठी थोडा वेळ लागेल. महाराष्ट्रात जाऊन मी दौरे करीन. महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार हवे असल्याची भूमिका मांडेन आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस भाजप बरोबर सत्तेत येईल असे खुद्द पवारांनीच भाजप श्रेष्ठींना आमच्या समोर सांगितले होते, असा पुढचा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला.

भाजप श्रेष्ठींची 2019 मध्ये शरद पवारांची चर्चा झाली होती. त्या चर्चेनुसारच माझ्याकडे आणि अजित पवारांकडे सरकार बनविण्याची, सरकारचे खाते वाटप करण्याची, पालकमंत्री पदाचे वाटप करण्याची जबाबदारी सोपविली होती, असा पहिला गौप्पस्फोट फडणवीस यांनी केल्यानंतर महिनाभरातच त्याचा परिणाम दिसून राष्ट्रवादी फुटली. शरद पवारांना सोडून अजित पवार हे शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. आज इंडिया टुडे कन्क्लेव्ह मध्ये फडणवीस यांनी दुसरा गौप्यस्फोट केल्यानंतर त्याचा राजकीय परिणाम काय होणार??, हे लवकरच दिसणे अपेक्षित आहे.

मात्र, 2023 मध्ये अजित पवार सत्तेवर येण्यासंदर्भात शरद पवारांशी चर्चा झाली नाही. ती अजित पवारांशी झाली. आता देखील शरद पवारांशी भाजपची कोणतीही चर्चा सुरू नाही. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात कुठली चर्चा होत असेल, तर त्याचा भाजपशी काहीही संबंध नाही, असा स्पष्ट खुलासाही देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मुलाखतीत केला.

Another narrative of Sharad Pawar destroyed by Fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात