विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्धव ठाकरे शिवसेना वळणावर गेली आणि निवडणूक आयोगावर पक्षपाताचा आरोप करून बसली. Sharad pawar’s NCP following uddhav shivsena, targets election commission over its own split
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मूळ पक्षावर दावा सांगणारी याचिका अजित पवारांनी दाखल केली. त्यावर निवडणूक आयोगाने शरदनिष्ठ आणि अजितनिष्ठ अशा दोन्ही गटांना नोटीसा पाठवून उत्तर मागितले. या मुद्द्यावर आता परवा 6 ऑक्टोबरला प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे.
मात्र निवडणूक आयोगाच्या नोटीशीला उत्तरे देताना शरदनिष्ठ राष्ट्रवादीने निवडणूक आयोगावरच एकांगी निर्णय दिल्याचा आरोप केला. मूळ पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगळे असताना निवडणूक आयोगाने पक्षात फूट झाल्याचे परस्पर मान्य केलेच कसे??, असा सवाल शरदनिष्ठ राष्ट्रवादीने या उत्तरात केला.
काँग्रेस, राष्ट्रवादी देखील राजकीय अस्पृश्यता पाळतात; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
वास्तविक निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीतील फुटी संदर्भात अद्याप कोणताही अधिकृत निर्णय दिलेला नाही. फक्त अजित पवारांच्या याचिकेवर शरदनिष्ठा आणि अजितनिष्ठ राष्ट्रवादी यांना नोटीसा पाठवून लेखी उत्तरे मागविली आहेत. निवडणूक आयोगासमोर प्रत्यक्ष सुनावणी अजून बाकी आहे, पण तरी देखील लेखी उत्तरातच शरदनिष्ठ राष्ट्रवादीने निवडणूक आयोगावर एकांगी असल्याचा आरोप करून आपण उद्धव ठाकरे शिवसेना वळणावरच गेल्याचे दाखवून दिले.
उद्धवनिष्ठ शिवसेनेने देखील शिवसेनेतील फुटी संदर्भात निवडणूक आयोगाने निर्णय देण्यापूर्वीपासूनच आयोग मोदी सरकारच्या दबावाखाली येऊन निर्णय देत असल्याचा आरोप केला होता. वास्तविक त्यावेळी निवडणूक आयोगाने शिवसेनेबद्दलही निर्णय दिला नव्हता, पण सुरुवातीपासूनच उद्धवनिष्ठ शिवसेनेने निवडणूक आयोगावर आक्षेप घ्यायला सुरुवात करून तो आत्तापर्यंत कायम ठेवला. शरदनिष्ठ राष्ट्रवादी देखील त्याच वळणावर गेली आहे. राष्ट्रवादीतील फुटी संदर्भात अधिकृत निर्णय येण्यापूर्वीच निवडणूक आयोगावर पक्षपाताचा आरोप करून बसली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App