पालकमंत्री पद मिळवून अजितदादांनी शिंदे गटावर मात केल्याची बातमी; पण दादांना राजकीय किंमत करावी लागणार चुकती!!

Ajit pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची काल बैठक झाली. त्या बैठकीला अजित पवार हजर नव्हते. ते आजारी होते. त्यांचा आवाज चोक झाला होता म्हणून ते येऊ शकले नाहीत. त्यानंतर शिंदे – फडणवीसांचा अचानक दिल्ली दौरा झाला आणि आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. Ajit pawar have to pay political price for his pune guardian ministership in loksabha elections 2024

या घटनाक्रमाचे वेगवेगळे डॉट्स जोडत माध्यमांनी अजित पवारांनी शिंदे गटावर मात केल्याच्या बातम्या दिल्या. पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी अजित पवार रुसले होते. त्यामुळे शिंदे – फडणवीसांना तातडीने दिल्ली गाठून पालकमंत्री पदाच्या यादीवर शिक्कामोर्तब करवून घ्यावे लागले आणि नंतर ती जाहीर करावी लागली. यामध्ये अजित पवारांच्या बरोबर आलेल्या 7 मंत्र्यांना पालकमंत्री पदे मिळाली. शिंदे गटाच्या मंत्र्यांना आणि भाजपच्या मंत्र्यांना “त्याग” करावा लागला. अर्थातच शिंदे गटावर अजितदादांनी मात केली, अशा आशयाच्या या बातम्या आहेत.

पण ही झाली डॉट्सची वरवरची जोडणी… मग प्रत्यक्षात काय घडले??, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

अजित पवारांना दुसऱ्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री पद आणि त्यांच्याबरोबर 8 जणांना भाजपच्या सोयीनुसार मंत्रीपद अशी राजकीय खेळी केल्यानंतर अजितदादांसह सर्व मंत्र्यांना पालकमंत्री पदासाठी तब्बल 3 महिने ताटकळत राहावे लागले. त्यासाठी “नाराज” व्हावे लागले आणि नंतर भाजप श्रेष्ठींनी पालकमंत्री पदे मंजूर केली.


Ajit Pawar : लोकांना फुकट पाणी आणि वीज आवडते, पण त्यात सगळा महसूल खर्च होतो; अजित पवारांचे वक्तव्य!!


एरवी गेल्या 15 वर्षांमध्ये अजित पवार जेव्हा उपमुख्यमंत्री झाले, त्या प्रत्येक वेळी अजितदादांना एकाही दिवसाची वाट न पाहता पुण्याचे पालकमंत्री पद बहाल केले गेले होते. पण शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळात ते घडले नव्हते. उलट त्यांना स्वतःच्या अटी शर्तींपेक्षा भाजप श्रेष्ठींच्या अटी शर्तींवर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना पालकमंत्री पे मिळाली आहेत आणि नेमक्या याच अटी शर्ती म्हणजे अजितदादांसाठी राजकीय किंमत चुकवावी लागण्याची खरी बातमी आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुका भाजप शिंदे – शिवसेना आणि अजितनिष्ठ राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत. त्याचे जागावाटप आणि उमेदवारी वाटप याच्या सर्व नाड्या भाजप श्रेष्ठींच्या हातात आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भाजप 35 जागा, तर शिंदे शिवसेना आणि अजितनिष्ठ राष्ट्रवादी यांच्यात उरलेल्या 13 जागांमध्ये वाटप होणे अपेक्षित आहे. याचा अर्थ लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र पुढचा भाजपचा दुपटीपेक्षा जास्त वरचष्मा राहणार आहे.

इतकेच नाही तर पुण्यासारख्या महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघात भाजपने अत्यंत महत्त्वाच्या नेत्याला तिकीट दिल्यानंतर त्याच्याशी कुठूनही दगाफटका होणार नाही हे पाहण्याची “जबाबदारी” अजितदादांवर टाकण्यात आल्याची महत्त्वाची बातमी आहे.

भाजपसोबत आलेल्या शिंदे गट आणि अजित पवार गट यांना यांच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी ही भाजपचीच आहे, असे वक्तव्य पुण्यामध्ये करून देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना चुकवाव्या लागणाऱ्या राजकीय किमतीचे सुतोवाच्या केलेच होते. याचा अर्थ भाजपच्या उमेदवारांना खऱ्या अर्थाने मदत करण्याची “जबाबदारी” देखील शिंदे गट आणि अजितनिष्ठ राष्ट्रवादीची आहे. त्यात कोठेही दगाफटका चालणार नाही, हेच फडणवीसांनी आपल्या वक्तव्यातून सुचित केले.

दगाफटका करण्याचा इतिहास कोणाचा?

महाराष्ट्रात राजकीय दगाफटका करण्याचा इतिहास नेमका कोणाचा आहे हे महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला माहिती आहे पण इथून पुढे तो दगाफटका चालणार नाही. आता भाजपने स्वतःच्या अटी-शर्टींवर अजितदादांना पुण्याचे पालकमंत्री पद देऊन त्यावर शिक्कामोर्तब केले आहे, हा अजितदादांच्या पालकमंत्री पदाचा खरा राजकीय अर्थ आहे!!

Ajit pawar have to pay political price for his pune guardian ministership in loksabha elections 2024

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात