विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद – पाकव्याप्त काश्मीरमधील तथाकथित विधानसभा निवडणुकीमध्ये पाकिस्तान तेहरीके इन्साफ (पीटीआय) या पक्षाने सर्वाधिक २३ जागा जिंकल्या आहेत.पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे ‘पीटीआय’चे अध्यक्ष आहेत. Imran Khan’s Tehreek-e-Insaf wins in Pakistan-occupied Kashmir
भारताने ही निवडणूक बेकायदा असल्याचे जाहीर करत निषेध व्यक्त केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या या पक्षाने हा विजय मिळवताना विरोधकांचा दारूण पराभव केला आहे.
निवडणुकीच्या प्रचारात इम्रान खान यांनी अनेक वादग्रस्त भाषणे केली होती. त्यामुळे अनेकदा वादाचे प्रसंग उभे राहिले होते. या निवडणुकीत पाकिस्तान पीपल्स पार्टीला आठ, तर पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज गट) या पक्षाला केवळ सहा जागा मिळाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App