माजी इस्रो शास्त्रज्ञांच्या फसवणूकप्रकरणी सुप्रीम कोर्टाने म्हटले – सीबीआयने एफआयआर नोंदवला, आदेशाची गरज नाही

Nambi Narayan isro espionage case sc says cbi will have to collect materials independently

Nambi Narayan isro espionage case : इस्रोचे माजी वैज्ञानिक नंबी नारायणन यांना अडचणीत आणणार्‍या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने सांगितले की, सीबीआयने अहवालात म्हटले आहे की त्यांनी एफआयआर नोंदविला आहे. आता स्वतंत्र ऑर्डरची आवश्यकता नाही. कायद्यानुसार पुढील कार्यवाही करा. Nambi Narayan isro espionage case sc says cbi will have to collect materials independently


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : इस्रोचे माजी वैज्ञानिक नंबी नारायणन यांना अडचणीत आणणार्‍या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने सांगितले की, सीबीआयने अहवालात म्हटले आहे की त्यांनी एफआयआर नोंदविला आहे. आता स्वतंत्र ऑर्डरची आवश्यकता नाही. कायद्यानुसार पुढील कार्यवाही करा.

यापूर्वी 15 एप्रिल रोजी कोर्टाने सीबीआयला तीन महिन्यांत या प्रकरणाचा तपास अहवाल सादर करण्यास सांगितले होते. स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन बनविण्यात सहभागी असलेल्या नंबी नारायणन यांना 1994 मध्ये केरळ पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर हे तंत्रज्ञान परदेशी व्यक्तींना विकल्याचा आरोप होता. नंतर हे संपूर्ण प्रकरण बनावट ठरले. कोर्टाने यापूर्वी या शास्त्रज्ञाला 50 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले होते. यासह त्यांना अडकविणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईबाबत निर्देश दिले होते.

194 मध्ये इस्रो हेरगिरी प्रकरण उघडकीस आले तेव्हा नारायणन यांना इस्त्रोच्या आणखी एक वरिष्ठ अधिकारी, मालदीवच्या दोन महिला आणि एका व्यावसायिकासह हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. केरळमधील तत्कालीन उच्च पोलीस अधिकारी नारायणन यांच्या बेकायदेशीर अटकेसाठी जबाबदार असल्याचे सीबीआयला आढळले होते. त्यानंतर समितीने नारायणन यांना कोणत्या परिस्थितीत अटक केली याची चौकशी केली. त्यांच्यावर भारताच्या अंतराळ कार्यक्रमाशी संबंधित गोपनीय कागदपत्रे परदेशात दिल्याचा आरोप होता. नारायणन म्हणाले होते की, केरळ पोलिसांनी हे प्रकरण तयार केले होते आणि ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून चोरी केल्याचा आरोप केला जात होता, त्यावेळी ते अस्तित्वातही नव्हते.

Nambi Narayan isro espionage case sc says cbi will have to collect materials independently

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात