राजीनाम्यासाठी कुणीही दबाव आणला नाही, मुख्यमंत्रीपदासाठी मी कुणाचेही नाव सुचवलेले नाही; येडियुरप्पांचा खुलासा


वृत्तसंस्था

बेंगळूरू : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होताना बी. एस. येडियुरपप्पांनी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. राजीनामा देण्यासाठी माझ्यावर कुणीही दबाव आणलेला नाही, तसेच कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदासाठी मी कोणाचेही नाव सुचवलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.Nobody pressurised me to resign. I did it on my own so that someone else can take over as CM after completion of 2 years of govt.

राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. येडियुरप्पा यांनी काही अटी – शर्तींवर मुख्यमंत्रिपद सोडले आहे अशा बातम्या राजकीय वर्तुळात फिरत होत्या. त्यांनी आपल्यानंतर कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण असावा याबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला काही नावे सूचविल्याचेही बातमीत म्हटले होते. परंतु ही बातमी येडियुरप्पांनी फेटाळून लावली.



दोन वर्ष कर्नाटकचा मुख्यमंत्री पदावर मी समाधानकारक काम केले. आता नव्या मुख्यमंत्र्यांना सूत्रे घेणे शक्य व्हावे यासाठी मी राजीनामा दिला आहे असे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे देखील कर्नाटकात राहूनच भाजपचे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

येडियुरप्पा हे लिंगायत समाजातील आहेत. चार दिवसांपूर्वी लिंगायत समाजातील 30 मठाधिपती यांनी येडियुरप्पा यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शविला होता. येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदावर टिकून राहावेत यासाठी हा दबाव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर आणण्याचा प्रकार होता. परंतु असा कोणताही दबाव कामी येऊ शकला नाही. येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांनी आपल्यावर राजीनाम्यासाठी कोणाचाही दबाव नसल्याचा खुलासा केला आहे.

त्याच वेळी नवा मुख्यमंत्री आपल्या गटाचा किंवा आपल्या समाजातील असावा अशी अपेक्षा त्यांनी उघडपणे व्यक्त केलेली नाही. उलट आपण कोणाचेही नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याचा अर्थ कर्नाटकात नवीन मांडणीमध्ये त्यांची भूमिका मर्यादित करून ठेवल्याचे स्पष्ट होत आहे.

Nobody pressurised me to resign. I did it on my own so that someone else can take over as CM after completion of 2 years of govt.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”