ममता सरकारने पुन्हा काढली खोडली, राज्यपाल, विरोधी पक्षनेत्यांच्या मोटारीवरील लाल दिवे हटविण्याचा घेतला निर्णय


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सराकरची घटनात्मक मनमानी सुरूच आहे. ममता सरकारने आता घटनात्मक प्रमुख असलेल्या राज्यपालांची आणि अधिकृत विरोधी पक्षनेत्याची खोडी काढली आहे. त्यांच्या मोटारीवरील लाल दिवे हटविण्याचा निर्णय घेतला आहे.Mamata Govt removes red lights on Governor’s car

मोटारीवर लाल दिवा लावण्यास पात्र असलेल्या अति महत्वाच्या व्यक्ती (व्हीआयपी) आणि अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. मात्र, या यादीमध्ये राज्यपाल आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्याचा समावेश नाही. गेल्या वेळी केलेल्या यादीमध्ये राज्यपालांचे नाव पहिले होते. त्याचबरोबर विरोधी पक्षनेत्यांचेही नाव होते.विद्यमान राज्यपाल जगदीप धनकर आणि तृणमूल कॉंग्रेस सरकार यांच्यात वाद सुरू आहे. विरोधी पक्षनेते असलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी निवडणुकीपूर्वी तृणमूल कॉंग्रेसचा त्याग करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पराभवही केला आहे.

त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा दोघांवरही राग आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या सरकारने घटनात्मक अधिकार असूनही त्यांच्या मोटारीवरील दिवे काढण्याचा निर्णय घेतला आहे.
परिवहन विभागातील अधिकाºयाच्या मतानुसार सुवेंद्रू अधिकारी यांचा विरोधी पक्षनेते या नात्याने घटनात्मक अधिकारी आहे.

त्यांना कॅबीनेट मंत्रीपदाचा दर्जा आहे. त्यामुळे त्यांच्या मोटारीवर लाल दिवा असणे अधिकार आहे. मात्र, अधिकारी यांच्याविषयी असलेल्या रागामुळेच ममता सरकारने हा निर्णय घेतला आहे.

केवळ राज्यपाल आणि विरोधी पक्षनेतेच नव्हे तर २०१४ च्या यादीतून कोलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश, विधानसभेचे अध्यक्ष आणि राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल यांची नावेही वगळण्यात आली आहे. हे नजरचुकीने झाले आहे की मुद्दामहून केल आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

राज्य सरकारने हा आदेश दिल्यावर लाल दिव्यासाठी पात्र नसलेल्या मोटारीवरील दिवसे काढून घेण्यात आले आहे. प्रधान सचिव आणि त्यांच्यावरील अधिकारी वगळता सर्व अधिकाऱ्यांच्या मोटारीवरील दिवे हटविण्यात आले आहेत.

महासंचालक आणि अतिरिक्त पोलिस महासंचालक, महानिरीक्षक आणि पोलिस उपमहानिरीक्षक, अग्निशमन सेवा महासंचालक, विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांना लाल दिवा वापरण्याचा अधिकार मिळणार आहे.

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, कोलकाता येथे बनावट लस रॅकेटचा उघड झाल्यावर नवीन यादी तयार करण्यात आली आहे. या प्रकरणातील सूत्रधार असलेला आरोपी देबरंजन देब हा स्वत:ला आयएएस अधिकारी असल्याचे भासवून निळा दिवा असलेल्या मोटारीतून फिरत होता. तेव्हापासून पोलीस दिवा असलेल्या मोटारींचे क्रमांकही तपासत आहेत. परंतु, याचा फायदा घेऊन ममता बॅनर्जी यांच्या सरकारने राज्यपाल आणि विरोधी पक्षनेत्याचा अपमान केला आहे.

Mamata Govt removes red lights on Governor’s car

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”