ममतांदीदींचे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत, पक्षाच्या संसदीय नेतेपदी निवड


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना आता राष्ट्रीय राजकारणात नेतृत्व करण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. पुढील आठवड्यातील ममतांच्या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता संसदीय पक्षाच्या नव्या अध्यक्षा म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आहे.Mammatadidi became TMC leader in Parlment

आगामी सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ममतांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिले असून संसदीय राजकारणामध्ये देखील त्या उतरणार आहेत.



सध्या ‘पेगॅसस’प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून तृणमूलनेही याच मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममतांचे राष्ट्रीय राजकारणात येणे महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

सध्या संसदेमध्ये तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला लढविण्याचे काम हे सुदीप बंदोपाध्याय करतात. लोकसभेवर निवडून न येताही संसदेमध्ये पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये ममता बॅनर्जी यांचा समावेश होणार आहे. याआधी सोनिया गांधी यांची १९९८ मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी संसदीय नेतेपदाची धुरा सांभाळली होती.

Mammatadidi became TMC leader in Parlment

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात