अबुधाबीतील भारतीय वंशाचे उद्योजक युसुफअली यांच्या शिरपेचात मानाचा तुरा


विशेष प्रतिनिधी

दुबई : अबुधाबीचे युवराज शेख महंमद बिन झायेद अल नहयान यांनी अबुधाबीमधील सर्व व्यापारावर नियंत्रण ठेवणाऱ्या समितीच्या (एडीसीसीआय) उपाध्यक्षपदावर युसुफअली या भारतीय वंशाच्या उद्योजकाची नियुक्ती केली आहे. या समितीच्या २९ संचालकांच्या यादीत ते एकटेच भारतीय आहेत.
युसुफअली हे अबुधाबीमधील लुलू ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांच्या कंपनीचे ‘युएई’सह अनेक देशांमध्ये हायपरमार्केट आणि रिटेल कंपन्या आहेत. Indian origin get opportunity in Abudhabi



युसुफअली यांच्या पाच दशकांमधील योगदानाबद्दल त्यांना नुकताच अबुधाबी पुरस्कार -२०२१ मिळाला आहे. दोन महिन्यांपूर्वी युसुफअली यांनीच एका केरळी युवकाची मृत्युदंडातून सुटका केली होती. त्यांनी दंडाची रक्कम भरल्याने, एकाच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या या युवकाला मायदेशी परतता आले.

शेख महंमद यांनी नवीन संचालक मंडळ जाहीर करताना युसुफअली यांना उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. ‘एडीसीसीआय’चे अबुधाबीतील सर्व व्यापारी कंपन्यांवर नियंत्रण असून त्यांच्याकडून परवाना मिळाल्याशिवाय कंपनीला कोणतेही व्यवहार करता येत नाहीत. या समितीवर आपली निवड होणे हा अभिमानाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया युसुफअली यांनी दिली आहे.

Indian origin get opportunity in Abudhabi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”