१५५ किलोमीटर वेगाने घोंघावणाऱ्या ‘इन-फा’ वादळाचा चीनला तडाखा, शेकडो विमाने रद्द


विशेष प्रतिनिधी

शांघाय : चीनच्या पूर्व किनाऱ्याला इन-फा या चक्रीवादळाने धडक दिली आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर या भागातील सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली असून नागरिकांना घरातच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. cyclone hits in China

वादळाने झेनजिआंग प्रांतातील झौशन गावाला सर्वप्रथम धडकले. या वादळामुळे पूर्व किनाऱ्यावर ३५० मिमी पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. वादळातील वाऱ्यांचा वेग १५५ किलोमीटर प्रतितास इतका आहे. या वादळाने तैवानलाही तडाखा दिला आहे.



वादळाचा जोर असल्याने शांघाय येथील दोन्ही विमानतळांवरून होणारी शेकडो विमान उड्डाणे रद्द करावी लागली असून उद्याही हे विमानतळ बंदच राहण्याची शक्यता आहे. शांघायच्या जवळच असलेल्या निन्गबो शहरातही पावसाचा जोर असून सर्व प्रकारची वाहतूक विस्कळीत झाली आहे. चीनच्या मध्य प्रांतात पूरपरिस्थिती कायम असताना हे दुसरे नैसर्गिक संकट चीनवर येऊन धडकले आहे. या चक्रीवादळामुळे काही प्रमाणात वित्त हानी झाली असली तरी अद्यापपर्यंत कोणीही मृत्युमुखी पडल्याचे वृत्त नाही.

पुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ६३ झाली असून चीन सरकारने पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी पाणी आणि अन्नाची पाकिटे पाठविली आहेत. चिनी सैनिकही बचाव कार्य करत आहेत.

cyclone hits in China

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात