सप्टेंबरच्या‌ अखेरपर्यंत लहान मुलांसाठीची लस उपलब्ध होणार – डॉ. गुलेरिया यांचा अंदाज


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : येत्या सप्टेंबर महिन्याच्या‌ अखेरपर्यंत भारत बायोटेकची लहान मुलांसाठी लस उपलब्ध होऊ शकेल. त्यानंतर श्रेणी पद्धतीने आपण शाळा सुरू करायला हव्यात. मुलांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर त्यांना संरक्षण मिळेल आणि लोकांना देखील लहान मुले सुरक्षित असल्याचा आत्मविश्वालस वाढेल असे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. BIOTEC vaccine for children available in Sept.

ते म्हणाले. कोरोनाच्या विषाणूमध्ये नजीकच्या भविष्यात विविध उत्परिवर्तन होण्याची शक्यता असल्याने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊन थांबता येणार नाही. त्यासाठी पुढील काळात नव्या लसीचे बूस्टर डोस घेण्याची गरज लागू शकेल.



काळापरत्वे माणसांमधील रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. अशा परिस्थितीत‌ कोरोना विषाणूमध्ये बदल झाल्यास त्याला आधी घेतलेले लसीचे डोस संसर्गापासून रोखतीलच, असे सांगता येत नाही. त्यामुळे बूस्टर डोसचा‌ विचार करावा लागेल. या डोसच्या चाचण्या देखील सुरू आहेत.

यावर्षीच्या अखेर कदाचित बूस्टर डोस उपलब्ध होतील. भारत बायोटेकची मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस येत असून, त्याच्या चाचण्या सुरू आहेत. या लसीचा अंतिम टप्पा सप्टेंबरपर्यंत पूर्ण होऊन लस वापरासाठी उपलब्ध होऊ शकेल.

BIOTEC vaccine for children available in Sept.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात