विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांतील नागरिकांमध्ये राज्यातील सीमांवरुन जोरदार हिसांचार निर्माण झाला.सोमवारी झालेल्या या हिंसाचाराला आळा घालण्याच कर्तव्य बजावत असताना ६ जवान शहीद झाले.आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.Violence on Assam-Mizoram border,6 policemen martyred
आसाम आणि मिझोराम या दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या हिसांचारावर ट्विट करुन एकमेकांच्या अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
असे म्हणतात की दोन्ही बाजुंचे अधिकारी मतभेद मिटवण्यासाठी वाटाघाटी करीत असताना अचानक दोघांनी गोळीबार सुरु केला. गेल्या काही दिवसांत आसाम आणि मिझोराम तणाव वाढला असुन सोमवारी दगडफेकही झाल्याचे चित्र समोर आले आहे.अमित शहा यांनी आसाम आणि मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांशी सीमा वादावर चर्चा करुन त्यातुन मार्ग काढण्यास सांगितले.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केले की , सोमवारी मिझोरामच्या बाजूकडील दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात काचार जिल्ह्यात आसाम पोलिसांचे सहा जवान शहीद झाले.त्याचवेळी आसामचे मंत्री परिमल शुक्ला वैद्य म्हणाले की , या हिंसाचारात सुमारे ८० लेक जखमी झाले आहेत.
आसाम पोलिसांकडुन कोणताही गोळीबार झाला नाही.जालियनवाला बागेत मिझोरामच्या बाजुने गोळीबार हा ब्रिटिशांनी केलेल्या गोळीबाराप्रमाणे करण्यात आला होता.मिझोराम पोलिस उंचावर होते.तर आसाम पेलिस मैदानावर होते.
पुढे ते म्हणाले की, आसाम-मिझोराम सीमेवर आमच्या राज्याच्या घटनात्मक हद्दीचे रक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला.मृत पोलीस जवानांच्या कुटुंबियांबद्द्ल मी मनापासुन संवेदना व्यक्त करतो.आसाम पोलिसांकडुन मिझोराममधील समाज कंटकांच्या गटाने दगडफेक केल्याचा आणि आसामच्या सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला होता.
आसामच्या लैलापुर जिल्ह्यावरुनही दोन्ही राज्यांमध्ये वाद आहे. मिझोराम लैलापुरवर हक्क सांगत आहे.आसाममधील बराक घाटी परिसरातील कछार, करीमगंज आणि हाईलकांडीची १६४ किमीची सीमा मिझोराम राज्यातील आईजोल,कोलासीब आणि मामित जिल्ह्यांना लागते.जमीनीच्या कारणावरुन ऑगस्ट २०२० पासुन आंतरराज्य सीमेवर संघर्ष सुरु झाला आहे.
मिझोरामचे पोलिस महानिदेशक लालबियाकथंगा खिंगागते यांनी पीटीआयला दिलेल्या माहितामध्ये वादग्रस्त भागात एटलांन नदीच्या जवळील भागात रात्री आठ झोपड्या जाळण्यात आल्याच सांगितल.हिमंता बिस्वा सरमा आसामचे मुख्यमंत्री झाल्यानंतर संघर्ष वाढला आहे.गेल्यावर्षी झालेल्या संघर्षानंतर केंद्र सरकारन हस्तक्षेप केला होता.
मिझोरामचे मुख्यमंत्री जोरामगांथा यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्री अमित शहांसोबत झालेल्या बैठकीची आठवण करुन दिली.गृहमंत्र्यांसोबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर आसाम पोलिसांच्या दोन तुकड्या आणि नागरिकांनी मिझोराममध्ये वॅरेनग्टे ऑटो रिक्षा स्टॅंडवर लाठीचार्ज करुन अश्रूधुराच्या कांड्या फोडल्याच सांगितल .
सीआरपीएफच्या जवानांनी मिझोराम पोलिसांवर आक्रमण केल्याचा दावा मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी केला.गृहमंत्री मित शहा यांनी या प्रकरणात लक्ष घातल असुन आसाम आणि मिझाराम या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन समोपचाराने तोडगा काढण्याची विनंती केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App