ममता बॅनर्जी यांचा खेला त्रिपुरामध्येही सुरू, प्रशांत किशोर यांच्या टीमला त्रिपुरात केले नजरकैैद केल्याची उठविली आवई


विशेष प्रतिनिधी

त्रिपुरा : पश्चिम बंगालमध्ये विविध हथकंडे वापरून खेला करत सत्ता मिळविल्यावर आता ममता बॅनर्जी यांनी त्रिपुरातही हेच सुरू केले आहे. निवडणूक रणनितीकार प्रशांत भूषण यांच्या टीमला त्रिपुरात नजरकैैदेत ठेवल्याचा आरोप केला जात आहे.Mamata Banerjee’s game starts in Tripura too, alleges Prashant Kishor’s team was arrested in Tripura

प्रशांत किशोर यांची टीम या राज्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेत आहे. मात्र त्यांच्या आय-पॅक संस्थेतील २३ जणांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप होत आहे. त्रिपुरातील हॉटेलमधून बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आल्याचा आरोप कर्मचाºयांनी केला आहे. आयपॅकचे कर्मचारी अगरतलामधील वुडलँड हॉटेलमध्ये थांबले आहेत.



या कारवाईनंतर त्रिपुरातील तृणमूल काँग्रेस नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. लोकशाहीवर हल्ला असल्याची टीका केली आहे. त्रिपुरातील तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष आशीष लाल सिंह म्हणाले, हा लोकशाहीवर हल्ला आहे. मी त्रिपुरात राहणारा आहे. ही त्रिपुराची संस्कृती नाही. त्रिपुरात भाजपाच्या पायाखालची जमीन सरकल्याने अशा पद्धतीने वागत आहे.

मात्र, केवळ  कोविड प्रोटोकॉलमुळे त्यांना बाहेर पडण्यास मज्जाव केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. करोना चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्यांना परवानगी देऊ, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची जबाबदारी तृणमूल काँग्रेसने प्रशांत किशोर यांच्या खांद्यावर दिली होती. त्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला घवघवीत यश मिळालं. आता तृणमूल काँग्रेसचं २०२४ च्या लोकसभा निवणुकीकडे लक्ष लागून आहे.

Mamata Banerjee’s game starts in Tripura too, alleges Prashant Kishor’s team was arrested in Tripura

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात