माझा कर्मावर विश्वास सांगत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी केला पनौती असलेल्या घरात प्रवेश


विशेष प्रतिनिधी

डेहराडून : डेहराडून येथील मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान हे पनौती असलेले मानले जाते. परंतु,आपला कर्मावरच विश्वास असल्याचे सांगत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी सोमवारी या निवासस्थानात प्रवेश केला. हे निवासस्थान मुख्यमंत्र्यांचीे अधिकृत निवासस्थान आहे.Expressing his faith in deeds, Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami entered the house

डेहराडूनमधील न्यू कॅन्टोन्मेंट रोडवरील १०० एकरांवर विस्तारलेला हा बंगला अत्यंत भव्य आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांसाठी पनौती असल्याचे मानले जाते. तीन माजी मुख्यमंत्र्यांचे दुर्दैव याच बंगल्यात ओढवले. त्यांना कार्यकाळ संपण्यापूर्वीच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. रमेश पोखरियाल निशंक, विजय बहुगुणा आणि त्रिवेन्द्रसिंग रावत यांनी या निवासस्थानी राहण्याचा राहण्याचा निर्णय घेतला.



परंतु, त्यांना कार्यकाळ पूर्ण करताआला नाही. हरीश रावत आणि तीरथसिंग रावत या दोन मुख्यमंत्र्यांनी यालाच घाबरून या निवासस्थानापासून दूर राहणेच पसंत केले. मात्र, त्यांनाही पदावरून वेळेआधीच जावे लागले. बंडखोरीनंतर कॉंग्रेस नेते हरीश रावत यांना राजीनामा द्यावा लागला होता. यावर्षी मार्च महिन्यात रावत यांना केवळ चार महिन्यांतच राजीनामा द्याव लागला होता.

मात्र, रावत यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदी आलेल्या पुष्करसिंग धामी यांनी मात्र कर्मावर विश्वास असल्याचे सांगत याच निवासस्थानी राहण्याचा निर्णय घेतला आहे. धामी आपल्या कुटुंबासमवेत पूजा करून औपचारिकपणे अधिकृत निवासस्थानी दाखल झाले.

धामी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मी भूतकाळाबद्दल विचार करीत नाही किंवा भविष्याबद्दल चिंता करीत नाही. माझा कर्मावर विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वापराशिवाय पडून देणे म्हणजे सरकारी संसाधनांचा अपव्यय आहे. त्यामुळे मी याच निवासस्थानी राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Expressing his faith in deeds, Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami entered the house

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात