संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे अध्यक्षपद भारताकडे येणार, समतोलासाठी उपयुक्त बाब


विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : पुढील महिन्यात भारताकडे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे फिरते अध्यक्षपद येणार आहे. या समितीमध्ये अस्थायी सदस्य म्हणून भारताचा दोन वर्षांसाठी समावेश झाला आहे. एका महत्त्वाच्या काळात भारताचा सुरक्षा समितीमध्ये समावेश झाला आहे. India will get UN security council presidentship

भारतासारख्या मोठ्या आकाराच्या आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरण असलेल्या देशाच्या सुरक्षा समितीमधील समावेशामुळे समतोल साधला गेला असल्याचे संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी सांगितले. कोरोना काळ आणि कायमस्वरुपी सदस्यांमधील तणाव यामुळे सुरक्षा समितीमधील एकसंधतेला तडे गेले आहेत.अशा वेळी भारताच्या समावेशाने समतोल आणि समन्वय साधला गेला आहे,’ असे तिरुमूर्ती यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले. या दोन वर्षांच्या काळात आणि अध्यक्षपदाच्या एका महिन्याच्या काळात महत्त्वाच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेण्यास आणि जबाबदारी खांद्यावर घेण्यासही भारत सक्षम आहे, असे त्यांनी सांगितले.

India will get UN security council presidentship

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”