आमने-सामने: बॉलिवुड क्वीन विरूद्ध कोन्ट्रवर्सि क्विन ; भारतात कोरोनाने हाल कंगनाची खंत ; ए बाई तू मदत कर ना भडकली राखी सावंत !

विशेष प्रतिनिधी

मुंबई  : अभिनेत्री राखी सावंत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोक प्रतिक्रिया देते. यावेळी राखीनं बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतशी पंगा घेतला आहे. नुसती पोकळ बडबड करण्याऐवजी कोरोना रुग्णांना मदत कर असा सल्ला कंगनाला दिला आहे.कंगना आणि राखी दोघीही कोणावरही भाष्य करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.BOLLYWOOD QUEEN KANGNA VS CONTROVERSY QUEEN RAKHI

आता राखीने अलीकडेच कंगना रनौतला एक संदेश दिला आहे. नुकतीच राखी एका ठिकाणी स्पॉट झाली होती. या दरम्यान, राखीने पापाराजींशी संवाद साधला आणि त्यादरम्यान तिने कंगनाला ऑक्सिजन सिलेंडर दान करण्यासही सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

तुमलोग कोरोना को पालो मत, उसको जवान मत होने दो, वो अभी बच्चा आहे, असे काय काय म्हणते आणि अखेरीस कंगनावर येते.  राखीला विचारले गेले की, ‘कंगनाजी सतत असे म्हणत आहेत की, आजकाल देशाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे.

बर्‍याच ठिकाणी ऑक्सिजन मिळत नाही, आपल्यासाठी, देशासाठी, कंगनाजींच्या या वक्तव्यावर काय म्हणायचे आहेत? यानंतर राखी म्हणाली, ‘कंगना जी, कृपया देशाची सेवा करा. आपल्याकडे इतके कोट्यावधी रुपये आहेत. त्यातून ऑक्सिजन खरेदी करा आणि लोकांमध्ये वितरित करा, आम्ही तर हेच करत आहोत.’

याशिवाय राखीने सर्वांना दुहेरी मास्क घालण्यास, हात धुण्यास आणि सुरक्षित अंतर ठेवण्यास सांगितले आहे. राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.देखो,  आता राखीचा हा संदेश कंगना किती मनावर घेते, ते बघूच.

BOLLYWOOD QUEEN KANGNA VS CONTROVERSY QUEEN RAKHI

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात