आपला महाराष्ट्र

Bachchu Kadu

Bachchu Kadu : ऑपरेशन टायगरनंतर पुढचा डाव; ‘खासदारांनंतर आता आमदारही येतील’, बच्चू कडूंचा दावा, उद्याच्या कार्यक्रमात 6 बंडखोर खासदार गैरहजर राहणार?

ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंड करत स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे. ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर आता शिंदे गटाची नजर ठाकरे गटाच्या आमदारांवर असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यालाच बळ देणारे वक्तव्य प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. “ठाकरे गटाच्या खासदारांनंतर आता आमदारही शिंदे गटात येतील. एकनाथ शिंदे यांचे नियोजन नेहमीच अचूक असते,” असा दावा त्यांनी केला.

Sanjay Raut

Sanjay Raut : ‘ऑपरेशन टायगर’वर ठाकरे गटाचा प्रतिहल्ला; आता ‘ऑपरेशन तुडवा’ सुरू करणार, संजय राऊतांचा इशारा

महाराष्ट्रातील ‘ऑपरेशन टायगर’ प्रकरणावरून राजकीय वातावरण आणखी तापले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज अत्यंत आक्रमक भूमिका घेत शिंदे गट, भाजप आणि बंडखोर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला. पक्षातून बाहेर पडलेल्या सहा खासदारांना कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप करताना राऊत यांनी आता ‘ऑपरेशन टायगर’ला उत्तर म्हणून ‘ऑपरेशन तुडवा’ सुरू करण्याचा इशाराही दिला आहे.

Eknath Shinde

Eknath Shinde : सहा खासदारांच्या बंडानंतर शिंदेंची ताकद वाढली; महाराष्ट्राच्या राजकारणात ‘नवा पॉवर सेंटर’ उदयास?

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणाऱ्या घडामोडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा लोकसभा खासदारांनी पक्ष नेतृत्वाविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद आणि प्रभाव लक्षणीयरीत्या वाढल्याचे मानले जात आहे.

Sanjay Shirsat

Sanjay Shirsat : कालच्या शिवीगाळीचाच आज स्फोट!; 6 खासदारांच्या बंडावर शिरसाटांचा दावा, पुढचा निर्णय शिंदे घेतील

महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’वरून आरोप-प्रत्यारोपांचे सत्र अधिकच तीव्र झाले आहे. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल करत, “काल ठाकरे गटाच्या एका नेत्याने सहा खासदारांना जाहीरपणे शिवीगाळ केली, त्याचाच स्फोट आज झाला आहे,” असा दावा केला. या खासदारांना आता त्या पक्षात राहायचे नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून, पुढे ते कोणती भूमिका घेतात यावर सर्व चित्र अवलंबून असेल, असेही त्यांनी म्हटले.

Operation Tiger

Operation Tiger : द फोकस एक्सप्लेनर : कसे घडले ‘ऑपरेशन टायगर’? 6 खासदारांचा पत्रातून दावा- ‘शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा डाव होता’

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंडाची भूमिका घेतल्याचा दावा समोर आला आहे. शिवसेना स्थापना दिनाच्या आदल्या दिवशीच घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे ठाकरे गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दिल्लीतील गुप्त बैठका, लोकसभा अध्यक्षांकडे सादर केल्याचे सांगितले जाणारे पत्र, जयपूरपर्यंत हलवण्यात आलेले खासदार आणि पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या कथित प्रयत्नांवरून आता शिवसेनेतील संघर्ष नव्या टप्प्यात पोहोचला आहे.

Amit Shah

ऑपरेशन टायगर पूर्ण, उद्या दोन शिवसेनेचे स्वतंत्र मेळावे; राजकीय मुहूर्त साधून अमित शाहांचा दोन दिवसांचा कोल्हापूर दौरा; पुढचे टार्गेट कोण??

ऑपरेशन टायगर पूर्ण, उद्या दोन शिवसेनेचे स्वतंत्र मेळावे; नेमका राजकीय मुहूर्त साधून अमित शाहांचा दोन दिवसांचा कोल्हापूर दौरा!!, यामुळे सगळ्या देशाचे राजकारण महाराष्ट्रात एकवटले.

शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा कथित धोका; ६ बंडखोर खासदारांनी साधला मोका!!

नाशिक : शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा कथित धोका; ६ बंडखोर खासदारांनी साधला मोका!!, हेच राजकीय वास्तव बंडखोर खासदारांच्या तथाकथित लेटर बॉम्ब मधून समोर आले. उद्धव […]

Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : काँग्रेस भाजपचीच ‘ए टू झेड टीम’; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, नांदेडमधील उदाहरण देत साधला निशाणा

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांवर जोरदार हल्लाबोल करत काँग्रेस ही प्रत्यक्षात भाजपचीच ‘ए टू झेड टीम’ असल्याचा गंभीर आरोप केला आहे. नांदेड महानगरपालिका निवडणुकीतील घडामोडींचा संदर्भ देत त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, भाजपविरोधी राजकारणाचा दावा करणारी काँग्रेस प्रत्यक्षात भाजपशी तडजोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

Naresh Mhaske

Naresh Mhaske : “तुमचे ‘राजे’ कधी मातोश्रीबाहेर पडले का?”; नरेश म्हस्केंचा संजय राऊतांवर हल्लाबोल, 65 नगरसेवकांचाही उल्लेख

महाराष्ट्रातील कथित ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेमुळे शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार फुटण्याच्या चर्चांदरम्यान आता शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांसाठी शिंदे गटाला जबाबदार धरण्यापूर्वी ठाकरे गटाने आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला देतानाच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरही अप्रत्यक्ष टीका केली.

“ऑपरेशन टायगर” मध्ये म्हणे, शरद पवारांची “एन्ट्री”; प्रत्यक्षात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घुसण्याची साधणार “संधी”!!

“ऑपरेशन टायगर” मध्ये म्हणे, शरद पवारांची एन्ट्री; प्रत्यक्षात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घुसण्याची साधणार “संधी”!!, हेच राजकीय वास्तव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार कुठल्या नंतरच्या दुसऱ्या दिवशी दिसून आले.

1991 मध्ये शिवसेना फोडणाऱ्या शरद पवारांचा 2026 मध्ये संजय राऊतांना फोन; म्हणाले, फुटणाऱ्या खासदारांना धडा शिकवा, मोकळीक देऊ नका!!

1991 मध्ये शिवसेना फोडणाऱ्या शरद पवारांचा 2026 मध्ये संजय राऊतांना फोन; म्हणाले, फुटणाऱ्या खासदारांना धडा शिकवा, मोकळीक देऊ नका!!, ही राजकीय घडामोड आज घडली.

Gen Z

Gen Z : ‘जेन झी’ तरुणांवर संघाचा पूर्ण विश्वास; लोकसंख्येच्या असंतुलनामुळेच 1947 मध्ये फाळणी, सध्या लोकसंख्या संतुलनाची गरज!!

देशाच्या नव्या म्हणजेच ‘जेन झी’ पिढीबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचंड आशावादी आहे. आजचे तरुण आपल्या परंपरा आणि भारताच्या गौरवाशी मनापासून जोडले गेले असून समाजात रचनात्मक बदलांसाठी मोठे योगदान देत आहेत,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पुणे येथे केले. नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होते. त्याचवेळी श्री आंबेकर यांनी देशातल्या लोकसंख्या संतुलनाची गरज व्यक्त केली. “डेमोग्राफिक चेंज” मुळेच 1947 मध्ये देशाची फाळणी झाली, या महत्त्वाच्या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Bhaskar Jadhav

Bhaskar Jadhav : ‘डरो मत… जे होणार ते होणारच’:6 खासदारांच्या बंडानंतर भास्कर जाधवांचा उद्धव ठाकरेंना सल्ला, भाजपवरही घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धीर देतानाच भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “डरो मत, बिलकुल डरो मत… जो होनेवाला वो होने ही वाला है,” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना खंबीर राहण्याचा सल्ला दिला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे लोकसभेतील नऊपैकी सहा खासदार स्वतंत्र गटाच्या दिशेने वाटचाल करत असल्याच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पक्षासाठी हा मोठा धक्का असला तरी खचून न जाता नव्याने संघटन उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Arvind Sawant

Arvind Sawant : ऑपरेशन टायगरवर ठाकरे गटाचा पलटवार; “यशस्वी झाले असेल तर चेहरे दाखवा”, अरविंद सावंतांचे थेट आव्हान

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या कथित ‘ऑपरेशन टायगर’वरून ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये आरोप-प्रत्यारोपांची लढाई अधिक तीव्र झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांदरम्यान खासदार अरविंद सावंत यांनी आक्रमक भूमिका घेत शिंदे गटाला थेट आव्हान दिले आहे. “जर ऑपरेशन टायगर खरोखरच यशस्वी झाले असेल, तर संबंधित खासदारांचे चेहरे आणि पुरावे जनतेसमोर आणा,” असे सावंत यांनी म्हटले आहे.

Operation Tiger

Operation Tiger : ऑपरेशन टायगर खरोखर यशस्वी की फक्त राजकीय दबावतंत्र?; ठाकरे-शिंदे संघर्षात सस्पेन्स कायम

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले कथित ‘ऑपरेशन टायगर’ अद्यापही गूढतेच्या पडद्याआड आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पाठिंबा दिल्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे ठाकरे गटाने हे सर्व दावे फेटाळून लावत आपले सर्व खासदार पक्षासोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात संभ्रम आणि उत्सुकता दोन्ही वाढली आहे.

Vidhan Parishad

Vidhan Parishad : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान; ६ जागा बिनविरोध, २२ जूनला निकाल

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत असून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकूण १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असली तरी त्यापैकी ६ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित ११ जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकांची मतमोजणी २२ जून रोजी होणार असून त्यानंतर अंतिम निकाल स्पष्ट होईल.

Eknath Shinde

Eknath Shinde : ऑपरेशन टायगरला मोठा ब्रेक; ठाकरे गटातील दोन खासदारांच्या भूमिकेमुळे शिंदे गटाचा दावा अडचणीत

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य बंडाची चर्चा रंगली आहे. ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात असताना आता या संपूर्ण घडामोडीत नवे वळण आले आहे. ठाकरे गटाकडून असा दावा करण्यात आला आहे की, कथित बंडखोरीशी संबंधित पत्रावर दोन खासदारांनी सहीच केलेली नाही. त्यामुळे शिंदे गटाचे कथित ‘ऑपरेशन टायगर’ अडचणीत येऊ शकते.

Congress merger

प्रादेशिक नेत्यांनी पक्ष फुटल्याने हतबल होणे पसंत केले; पण काँग्रेसचा पर्याय का नाही स्वीकारला??

देशातल्या प्रादेशिक नेत्यांनी त्यांचे पक्ष फुटल्याने हतबल होणे पसंत केले; पण त्यांनी काँग्रेसचा पर्याय पर्याय का नाही स्वीकारला??, असा सवाल विचारायची वेळ प्रादेशिक नेत्यांच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या राजकीय वर्तणुकीतून आली.

Sandeep Deshpande

Sandeep Deshpande : पांढऱ्या पट्ट्यांऐवजी झाडं लावा; मनसेचा जैन समाजाला नवा प्रस्ताव, नितेश राणेंनाही टोला; वेदपाठकांना पाठिंबा कायम

मुंबईतील जैन समाजासाठी रस्त्यांवर काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून सुरू झालेला वाद आणखी तीव्र होताना दिसत आहे. या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता जैन समाजासमोर एक पर्यायी प्रस्ताव ठेवला आहे

उद्धव ठाकरेंच्या फुटीर खासदारांची आधी भाजपच्या सत्तेमध्ये “सोय”; नंतर संजय राऊतांची त्यांना शिवीगाळ; अनिल देसाईंचे सुप्रीम कोर्टावर खापर!!

उद्धव ठाकरे यांच्या कुटीर खासदारांची भाजपच्या सत्तेमध्ये “सोय” लावली आणि त्यानंतरच संजय राऊत यांनी त्यांना शिवीगाळ केली. त्याचबरोबर अनिल देसाई यांनी सुप्रीम कोर्टावर खापर फोडले.

Jain Muni Nileshchandra

Jain Muni Nileshchandra : ‘गांधींची गांधीगिरी नाही, गोडसेंची गोळी चालणार’:जैनमुनी निलेशचंद्रांचे वादग्रस्त विधान, कॉंग्रेसचा वस्त्र काढून उघडे पाडण्याचा इशारा

महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाच्या आर्थिक राजधानीत सध्या ‘पांढऱ्या पट्टी’चा वाद चिघळला असल्याचे पाहायला मिळत आहे. जैन समाजातील काही बांधवांनी त्यांच्या धर्मगुरूंसाठी तसेच जैन मुनींसाठी अनेक सोसायटींमध्ये तसेच रस्त्यांच्या बाजूने असलेल्या फूटपाथवर देखील या पट्ट्या रंगावण्यात आल्या आहेत.

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी!:मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात; 1 कोटी 77 लाख महिला ठरल्या पात्र

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यभरातील पात्र महिलांच्या बँक खात्यात १५ जूनच्या संध्याकाळपासून सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याआधी राज्य शासनाने मार्च आणि एप्रिल महिन्यांचा निधी एकत्रितपणे दिला होता; आता थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे मे महिन्याचा निधी टप्प्याटप्प्याने वितरित केला जात आहे.

कुंभमेळा हा सामाजिक एकत्वाचे माध्यम; कुंभमेळ्यातील जनसहभाग विषयावर महामंथन

कुंभमेळा हा केवळ पर्वणी आणि स्नानापुरता मर्यादित नसून, त्याला व्यापक धार्मिक व सामाजिक भावजागरणाचे अंग आहे. काळानुरूप परिवर्तन आणि सामाजिक एकत्वाची भावना या पर्वणीतून अधिक दृढ होते.

Bawankule

Bawankule  : महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा; बचत गटांना मिळणार 1 हेक्टर जमीन, सोबत 1 लाखांचे अनुदान; बावनकुळेंनी सांगितली नवी योजना

राज्यातील महिला बचत गटांसाठी राज्य सरकारने मोठी आणि महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. महसूल विभागाच्या पडीत जमिनींचा उपयोग करून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक पात्र महिला बचत गटाला एक हेक्टर (सुमारे अडीच एकर) जमीन पाच वर्षांच्या लीजवर देण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक गटाला एक लाख रुपयांचे अनुदानही दिले जाणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबतच पडीत सरकारी जमिनींचे संरक्षण आणि उत्पादनक्षम वापर हा या योजनेमागील प्रमुख उद्देश असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Dattatray Bharne

Dattatray Bharne : ‘अडीच लाखांच्या कर्जातील 50 हजार भरले तर 2 लाख माफ’:कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे मोठे विधान, नेमके काय म्हणाले भरणे?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारकडून 30 जूनपूर्वी राज्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली जाणार आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने दिलेल्या या आश्वासनाची शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. कर्जमाफीचे नेमके स्वरूप आणि निकष ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एका विशेष अभ्यास समितीची स्थापना केली असून, या समितीचा अहवाल प्राप्त होताच राज्य सरकारकडून अधिकृतपणे कर्जमाफी जाहीर केली जाईल, अशी माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे. दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सूचक विधान केले आहे.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात