Shrikant Shinde : उद्धव ठाकरे कधी जमिनीवर आलेच नाहीत, आता काय येणार? श्रीकांत शिंदेंचा टोला

Shrikant Shinde

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Shrikant Shinde उद्धव ठाकरे आतापर्यंत कधीही जमिनीवर आलेले नाहीत, ते आता काय येणार? त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे. नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीकास्त्र सोडले. तसेच संसदेत एनडीएची ताकद वाढली असून, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे 13 खासदार महाराष्ट्राचे प्रलंबित प्रश्न ताकतीने मांडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.Shrikant Shinde

डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, जंतर-मंतरवर सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरू होते. ते गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसले होते. जर त्यांचे काही बरे-वाईट झाले असते, तर त्याला कोण जबाबदार असते? त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना काही होऊ नये, याच काळजीपोटी त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. रुग्णालयात त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जाईल.Shrikant Shinde



12 वर्षांत एकही कलंक नाही

डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, यूपीए सरकारच्या काळात किती वेळा पेपर लीक झाले, ॲट्रॉसिटी झाल्या आणि मोठे भ्रष्टाचार झाले, हे सर्वांना माहीत आहे. याउलट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात 2014 ते 2026 या 12 वर्षांत भारताचा अभूतपूर्व विकास झाला आहे आणि देश पुढे जात आहे. या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही कलंक नाही, हीच खरी विरोधकांची पोटदुखी आहे, असा घणाघात त्यांनी केला.

मतदारसंघांच्या रचनेवर चर्चा करणार

डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, भविष्यात अशा कोणत्याही परीक्षांमध्ये गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी सरकारने आता तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आवश्यक ती सर्व काळजी घेतली आहे. या विधेयकाबाबत डीएमके आणि दक्षिण भारतातील इतर राज्यांचे नेमके काय म्हणणे आहे, हे सरकार ऐकून घेईल. त्यात काही योग्य बदल करायचे असतील, तर सरकार त्यासाठी तयार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. विरोधकांनी केवळ विरोधाला विरोध न करता देशाच्या हितासाठी काय गरजेचे आहे, याकडे पाहिले पाहिजे.

Uddhav Thackeray Has Never Been Grounded, What Will He Do Now: Shrikant Shinde

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात