लाईफ स्किल्स : वेगळ्या धाटणीचे, विपुल ऐका


शिकण्या दरम्यान तुम्ही जे ऐकत आहात, त्या संदर्भातील तुमचे पूर्वज्ञान, त्यांच्यातील साम्य-फरक शोधा, जे ऐकले त्याचे सार तुम्ही तुमच्या शब्दांत लिहून काढा. यामुळे त्या गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहतील. कारण ऐकलेली वाक्ये फार काळ जशीच्या तसी स्मरणात राहण्याची शक्यता कमी असते. पण ती जर तुम्ही कमी शब्दांत लिहून ठेवली तर मेंदूंत ती कोरली जातात. Meow – to meow, to remove the father, to rub the nose on the steps of the legislature … !!; Caution Maharashtra Legislative Assembly is in session !!!

ज्यावेळी काही वर्षांनी पुन्हा तुम्ही ती वाचता त्यावेळी त्याचे स्मरण तुम्हाला नक्की होते. यासाठी जे ऐकले ते क्रमवार लक्षात राहण्यासाठी ऐकत असतानाच नोंदी करा. शब्दरूपाने अथवा सांकेतिक भाषेत, आकृतीच्या रूपात अथवा मोबाइलमध्ये रेकॉर्ड करता येईल. जे ऐकले ते सतत आठवत राहा. ते इतरांशी शेअर करा. त्यांच्याशी याबाबत चर्चा करा, म्हणजे ही तात्पुरती जमा माहिती आपोआपच कायमस्वरूपी स्मरणशक्तीत रूपांतरित होईल. ऐकताना बोलणाऱ्याशी समरस व्हा. अनेकदा ऐकताना खास करून दमला असलात तर तुम्हाला झोप येऊ शकते. म्हणूनच वक्त्याकडे पाहा. श्रोत्याची सकारात्मक देहबोली, चेहऱ्यावरचे भाव, डोळ्यांद्वारे साधला जाणारा संवाद वक्तयाला प्रोत्साहित करत असतात. एखादा मुद्दा पटला नाही, समजला नाही, तर त्याची नोंद करा. प्रथम स्वत: त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा, अन्यथा वक्त्याला नम्रपणे विचारा.

सतत हेडफोन लावून ऐकणे अथवा सतत मोठमोठय़ा आवाजाच्या ठिकाणी वावरणे यामुळे केवळ तुमच्या श्रवणशक्तीवरच विपरीत परिणाम करतात असे नाही, तर त्यातून तुमच्या कानाच्या पडद्याला इजा होते, डोकेदुखी जडते, स्मरणशक्ती कमी होते, नैराश्य येते. जितके दर्जेदार, वेगवेगळ्या धाटणीचे, विपुल ऐकाल तेवढे छान प्रकट वाचन करणारे व्हाल, उत्तम संवाद साधू शकाल. म्हणूनच शाळा-महाविद्यालयांतील व्याख्याने, कथावाचन कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहा. त्याचप्रमाणे शहरात होणाऱ्या विविध प्रकारच्या व्याख्यानांना आवर्जून उपस्थीती लावा. त्याचा फादा झाल्याशिवाय राहणार नाही.

Meow – to meow, to remove the father, to rub the nose on the steps of the legislature … !!; Caution Maharashtra Legislative Assembly is in session !!!

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात