विशेष प्रतिनिधी
नांदेड : समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर या मराठी माणसावर अन्याय होत असताना शिवसेना गप्प का बसली आहे. नवाबाचे लाड का केले जात आहेत? शिवसेनेचा मराठी बाणा कुठे गेला?, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार नितेश राणे यांनी केला आहे.Why are you angry with Wankhede, why are you pampering Nawab Malik? Question to Nitesh Rane’s Chief Minister
देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणूक प्रचारा दरम्यान ते माध्यमांशी बोलत होते. राणे म्हणाले, मराठी माणसावर अन्याय होत असताना शिवसेना गप्प का बसली आहे. तुम्हाला वानखेडेंवर राग आहे,
तर सचिन वाझेंवर इतके प्रेम का? तुमचे हप्ते घरी आणून देत होता म्हणून का? हिम्मत असेल तर समीर वानखेडेंवर कारवाई करुन दाखवा, मग पुढचा कार्यक्रम आम्ही करू.भाजपाकडून सचिन वाझेवर कारवाई करण्याची मागणी केली असता,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो ओसमा बीन लादेन आहे का?, असा सवाल विधीमंडळात उपस्थित केला होता. आता आम्ही विचारतो आहे की वानखेडे काय दाऊद इब्राहिम आहे?, त्या नबावांचे इतके लाड का केले जात आहेत?, असे सवाल राणे यांनी केला
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App