Aryan Khan Drug Case: फरार गोसावीच्या साथीदाराचा धक्कादायक खुलासा! एनसीबीने धमकावून घेतल्या कोऱ्या पंचनाम्यावर सह्या, 18 कोटींच्या डीलपैकी 8 कोटी समीर वानखेडेंना?


आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या पंचनाम्यात एनसीबीचा साक्षीदार केपी गोसावीचा साथीदार प्रभाकर सेलने आरोप केला आहे की, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने त्याला धमकावून कोऱ्या पंचनाम्यावर स्वाक्षरी घेतली होती. गोसावी ही तीच व्यक्ती आहे जिच्यासोबत आर्यन खानचा सेल्फी व्हायरल झाला होता आणि नंतर एनसीबीने या प्रकरणात तो स्वतंत्र साक्षीदार असल्याचे सांगितले होते. प्रभाकर पुढे म्हणाला की, के.पी.गोसावींच्या ‘संशयास्पदरीत्या गायब झाल्यानंतर आता त्यांनाही एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून जिवाला धोका वाटत आहे. Absconding Gosavi’s partner revealed shocking facts in Aryan Khan Drugs Case, They were intimidated and signed on empty panchnama, deal of 18 crores


वृत्तसंस्था

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या पंचनाम्यात एनसीबीचा साक्षीदार केपी गोसावीचा साथीदार प्रभाकर सेलने आरोप केला आहे की, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने त्याला धमकावून कोऱ्या पंचनाम्यावर स्वाक्षरी घेतली होती. गोसावी ही तीच व्यक्ती आहे जिच्यासोबत आर्यन खानचा सेल्फी व्हायरल झाला होता आणि नंतर एनसीबीने या प्रकरणात तो स्वतंत्र साक्षीदार असल्याचे सांगितले होते. प्रभाकर पुढे म्हणाला की, के.पी.गोसावींच्या ‘संशयास्पदरीत्या गायब झाल्यानंतर आता त्यांनाही एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून जिवाला धोका वाटत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार प्रभाकरने सांगितले की, तो गोसावीचा अंगरक्षक म्हणून काम करायचा. मुंबईतील क्रूझवर छापा टाकण्यापूर्वी त्याला आणि गोसावी यांना कोर्‍या पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडण्यात आले. क्रूझमधून ड्रग्ज सापडले की नाही हे आपल्याला माहिती नाही असा दावाही त्यांनी केला आहे. प्रभाकरच्या मते, हा तोच कोरा पंचनामा आहे जो नंतर आर्यनच्या बाबतीत वापरला गेला आहे.

शाहरुखच्या मॅनेजरला मागितली 25 कोटींची खंडणी

प्रभाकरच्या मते, सॅमला भेटल्यानंतर गोसावी फोनवर कोणाशी तरी बोलत होता, ज्यात ’25 कोटींचा बॉम्ब ठेवण्याचा’ उल्लेख होता आणि हा करार 18 कोटींवर ठरवायचा होता, त्यापैकी 8 कोटी मिळणार होते समीर वानखेडे यांना. या संभाषणात शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा ददलानी यांच्याकडून हे पैसे घेण्याचा उल्लेख होता. पूजा ददलानी फोन उचलत नव्हत्या, याचाही प्रतिज्ञापत्रात उल्लेख करण्यात आला आहे.

मुंबई क्रूझ छाप्याआधी गोसावी ‘सॅम’ला भेटला

प्रभाकर पुढे म्हणाला की, मुंबई क्रूझमध्ये छापा टाकण्यापूर्वी गोसावी एनसीबी कार्यालयाजवळ ‘सॅम डिसूझा’ नावाच्या व्यक्तीला भेटले होते. प्रभाकरने पुढे सांगितले की, छाप्यादरम्यान त्याने काही व्हिडिओ आणि छायाचित्रे काळजीपूर्वक काढली होती. एका व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, गोसावीने आर्यन खानला ताब्यात घेण्यापूर्वी फोनवर कोणाशी तरी बोलायला लावले होते. त्यामागे मोठे षडयंत्र असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.



प्रभाकर सेलने असेही सांगितले की, त्याला पंच साक्षीदार बनवण्यासाठी समीर वानखेडे आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सुमारे 7 ते 8 पानांवर त्याची सही घेतली जी रिक्त पृष्ठे होती. प्रभाकर सेलने व्हिडिओ स्टेटमेंट जारी करून सांगितले की, समीर वानखेडेपासून त्याला धोका आहे, कारण त्याचीही चौकशी सुरू आहे.

प्रभाकरने एनसीबीलाच घेरले

एनसीबीने गोसावी यांना या प्रकरणात साक्षीदार करण्यास भाग पाडले होते, असा दावा प्रभाकरने केला आहे. ते म्हणाले की, गोसावी एक स्वतंत्र साक्षीदार होता आणि एक स्वतंत्र साक्षीदार छाप्यांविषयी माहिती कशी मिळवू शकतो. पंचनामा अगोदरच तयार होता आणि लोकांनी त्यावर स्वाक्षरीही केली होती, असेही तो म्हणाला. प्रभाकरच्या मते, या षड्यंत्राच्या मागे तो माणूस आहे ज्याच्याशी गोसावीने आर्यनला फोनवर बोलायला लावले होते. या संभाषणानंतरच आर्यनला ताब्यात घेण्यात आले. छाप्यापूर्वी गोसावी ज्या ‘सॅम’ नावाच्या व्यक्तीला भेटला होता त्याचा शोध घेण्याचे आवाहनही प्रभाकरने केले आहे.

Absconding Gosavi’s partner revealed shocking facts in Aryan Khan Drugs Case, They were intimidated and signed on empty panchnama, deal of 18 crores

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात