विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : राज्यातील घोटाळेबाज ठाकरे- पवार सरकारचे विसर्जन करणारच आहे, असा खणखणीत इशारा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पंढरपुरमध्ये दिला आहे. Thackeray-Pawar government will be Immersion : kirit somyaa
ते म्हणाले, घोटाळेबाज हसन मुश्रीफ मोकाट आणि मल जेलमध्ये आम्हाला पाठवता का ? कोल्हापूर दौऱ्यावर जाताना मला अडवण्याचा प्रयत्न केला. घोटाळेबाजांची आता सुटी नाही. मंत्र्यांच्या जेल वाऱ्या सुरु झाल्या आहेत. जितेंद्र आव्हाड जेलमध्ये जाऊन आले. आता परिवहन मंत्री अनिल परब यांचा नंबर आहे. अनिल देशमुख यांनी कपड्याची ब्याग भरून ठेवावी. लवकर प्रकट व्हावे.
उद्धव ठाकरे अलिबाबा आणि ४० चोरांचे सरकार असल्याचे डिसेंबर अखेर उघड होईल. पुणे जिल्ह्यात लोक म्हणतात ‘ सब जमीन पवार की’ , घोटाळेबाजाचे बारावे मी घालणार आहे. कोणालाही मी तसा सोडणार नाही, असा खणखणीत इशारा त्यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App