Target Killing : काश्मिरात दहशतवाद्यांचे पुन्हा भ्याड कृत्य, कुलगाममध्ये तीन परप्रांतीयांवर गोळीबार, दोन जणांचा मृत्यू

Target Killing In Kashmir Kulgam Terrorist fired at 3 Civilians 2 dead one injured

Target Killing  : पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये भ्याड कृत्य केले आहे. कुलगाममध्ये परप्रांतीयांवर गोळीबार करण्यात आला आहे. असे सांगितले जात आहे की, ज्या लोकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला ते सर्व मजूर होते आणि तेथे कामासाठी गेलेले होते. Target Killing In Kashmir Kulgam Terrorist fired at 3 Civilians 2 dead one injured


वृत्तसंस्था

श्रीनगर : पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये भ्याड कृत्य केले आहे. कुलगाममध्ये परप्रांतीयांवर गोळीबार करण्यात आला आहे. असे सांगितले जात आहे की, ज्या लोकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला ते सर्व मजूर होते आणि तेथे कामासाठी गेलेले होते. दहशतवाद्यांनी गोळीबार केलेल्या तीन बिगर काश्मिरी मजुरांची नावे राजा रेशी देव (मृत), जोगिंदर रेशी देव (मृत) आणि चुंचुन रेशी देव (जखमी) अशी आहेत. हे सर्व बिहारचे रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी या मजुरांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला आहे.

या संपूर्ण घटनेबाबत, जम्मू-काश्मीर पोलिसांकडून असे सांगण्यात आले आहे की, कुलगामच्या वानपोह भागात दहशतवाद्यांनी परप्रांतीय मजुरांवर अंदाधुंद गोळीबार केला. या दहशतवादी घटनेत 02 स्थानिक लोक ठार झाले आणि 01 जखमी झाला. जखमी मजुराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि बीएसएफने परिसराला वेढा घातला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या दहशतवादविरोधी कारवाईमुळे दहशतवादी भडकले आहेत. ते एकापाठोपाठ सर्वसामान्य नागरिकांना, परप्रांतीयांना लक्ष्य करत आहेत. आदल्या दिवशीही दहशतवाद्यांनी पुलवामा आणि श्रीनगरमध्ये दोन लोकांची गोळ्या घालून हत्या केली. या घटनेनंतर पुन्हा एकदा लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू केली आहे. लष्कर आणि स्थानिक पोलिसांनी अज्ञात दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे.

नॅशनल कॉन्फरन्सने व्यक्त केले दुःख

जम्मू -काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सने या दुःखद घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पक्षाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही दक्षिण काश्मीरमधील वानपोह, कुलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो, यामध्ये 2 बिगर स्थानिक लोकांनी आपला जीव गमावला. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. आमची सहानुभूती त्यांच्या प्रियजनांसोबत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना भरून न येणारे नुकसान सहन करण्याची हिंमत लाभो.

दुसरीकडे, फारुक अब्दुल्ला यांनी सर्वसामान्य नागरिकांवरील होत असलेल्या या हल्ल्या दुर्भाग्यपूर्ण म्हटले आहे. त्यांनी हे काश्मिरींना बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.

Target Killing In Kashmir Kulgam Terrorist fired at 3 Civilians 2 dead one injured

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात