अंतराळात चित्रपटाच्या शूटिंगचा विक्रम रशियाच्या नावावर, 40 मिनिटांच्या सीनसाठी लागले 12 दिवस, क्रू सुखरूप पृथ्वीवर परतला

Russian Film Crew Returns To Earth After Shooting First Movie In Space

Russian Film Crew : एका रशियन फिल्म क्रूने पहिल्यांदाच अंतराळात चित्रपट शूट करत इतिहास रचला आहे. शूटिंगनंतर हा क्रू पृथ्वीवर सुखरूप परतला आहे. ‘चॅलेंज’ चित्रपटातील एका दृश्याचे चित्रीकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अंतराळात 12 दिवस घालवलेल्या क्रूमध्ये अभिनेत्री युलिया पेरेसिल्ड आणि दिग्दर्शक क्लीम शिपेन्को यांचा समावेश आहे, ते अनुभवी अंतराळवीर ओलेन नॉविट्स्कीसह परत आले आहेत, जे ISS वर 191 दिवस हजर होते. Russian Film Crew Returns To Earth After Shooting First Movie In SpaceRussian Film Crew Returns To Earth After Shooting First Movie In Space । एका रशियन फिल्म क्रूने पहिल्यांदाच अंतराळात चित्रपट शूट करत इतिहास रचला आहे. शूटिंगनंतर हा क्रू पृथ्वीवर सुखरूप परतला आहे. ‘चॅलेंज’ चित्रपटातील एका दृश्याचे चित्रीकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अंतराळात 12 दिवस घालवलेल्या क्रूमध्ये अभिनेत्री युलिया पेरेसिल्ड आणि दिग्दर्शक क्लीम शिपेन्को यांचा समावेश आहे, ते अनुभवी अंतराळवीर ओलेन नॉविट्स्कीसह परत आले आहेत, जे ISS वर 191 दिवस हजर होते.


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : एका रशियन फिल्म क्रूने पहिल्यांदाच अंतराळात चित्रपट शूट करत इतिहास रचला आहे. शूटिंगनंतर हा क्रू पृथ्वीवर सुखरूप परतला आहे. ‘चॅलेंज’ चित्रपटातील एका दृश्याचे चित्रीकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अंतराळात 12 दिवस घालवलेल्या क्रूमध्ये अभिनेत्री युलिया पेरेसिल्ड आणि दिग्दर्शक क्लीम शिपेन्को यांचा समावेश आहे, ते अनुभवी अंतराळवीर ओलेन नॉविट्स्कीसह परत आले आहेत, जे ISS वर 191 दिवस हजर होते.

या क्रूच्या स्पेस शटलने रविवारी सकाळी 6.45 वाजता (भारतीय वेळेनुसार) स्पेस स्टेशनवरून उड्डाण केले आणि सुमारे साडेतीन तासांनी सकाळी 10.05 वाजता कझाकिस्तानमध्ये यशस्वी लँडिंग केले. लँडिंगनंतर संपूर्ण क्रू सुरक्षित असल्याचे सांगितले जाते.

कझाकिस्तानमध्ये रिकव्हरी

या तिघांना रशियन हेलिकॉप्टरने कझाकस्तानच्या कारागंडा शहरातील रिकव्हरी केंद्रात नेण्यात आले आहे. अंतराळ प्रवासाचा थकवा गेल्यानंतर त्यांना विमानाने रशियातील स्टार सिटी येथील गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये नेले जाईल, जिथे त्यांची तपासणी केली जाईल.

5 ऑक्टोबरला गेले होते ISSवर

याआधी, पेरेसिल्ड (37) आणि शिपेन्को (38) शूटिंगसाठी 5 ऑक्टोबर रोजी ISS वर पोहोचले होते. त्या वेळी यूएस स्पेस एजन्सी नासाने एका ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, युलिया पेरेसिल्ड आणि क्लिम शिपेन्को, अंतराळवीर अँटोन श्काप्लेरोव्ह यांनी 5 ऑक्टोबर रोजी कझाकिस्तानमधील बैकोनूर कॉस्मोड्रोममधून भारतीय वेळेनुसार 2:25 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी उड्डाण केले.

अंतराळात 35 मिनिटांचे दृश्य चित्रित

‘चॅलेंज’ चित्रपटाच्या टीमला शूटिंगसाठी प्रशिक्षण देण्यात आले होते. ‘चॅलेंज’चे वेगवेगळे सीन्स शूट करण्यासाठी फिल्म क्रूने 12 दिवस अंतराळात घालवताना आयएसएसवर 35-40 मिनिटांचा दीर्घ सीन शूट केला.

या चित्रपटात एका महिला डॉक्टरची कथा आहे, जी अंतराळयात तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज असलेल्या अंतराळवीराला वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उड्डाण करते. आयएसएसवर असलेले अंतराळवीर अँटोन श्काप्लेरोव्ह आणि प्योत्र डुबरोव्ह यांनीही चित्रपटाच्या या दृश्यात छोट्या भूमिका केल्या.

Russian Film Crew Returns To Earth After Shooting First Movie In Space

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात