तामिळनाडूत सत्ता गमावल्यानंतरही अम्मांच्या सावलीत अण्णा द्रमूकच्या सुवर्ण महोत्सवाचे सेलिब्रेशन, पण पक्ष करिष्माई नेत्याच्याही शोधात!!


वृत्तसंस्था

चेन्नई : तामिळनाडूत सत्ता गमावल्यानंतरही जयललितांच्या अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या ५० व्या वाढदिवसाचे अर्थात सुवर्ण महोत्सवाचे जोरदार सेलिब्रेशन सुरू आहे. पण आता पक्ष करिष्माई नेत्याच्या शोधात असल्याचे देखील दिसत आहे. Even after losing power in Tamil Nadu, Anna DMK’s golden jubilee celebration in the shadow of Amma, but also in search of a charismatic leader of the party !!

मूळात सत्ता गमावलेला पक्ष तामिळनाडूत कुठले सेलिब्रेशन करतो, हेच मूळात राजकीय अप्रूप आहे. कारण तामिळनाडूच्या राजकारणातले प्रवाह प्रत्येक निवडणूकीत १८० अंशात बदलताना दिसले आहेत. राज्यात सत्ता गमावलेला पक्ष आणि नेतृत्व चार्म गमावलेले दिसते. हे तामिळनाडूने कलैग्नार अर्थात एम. करूणानिधी यांच्या बाबतीत अनुभवले आहे, तसेच ते थलयवी जयललितांच्या बाबतीतही अनुभवले आहे.

पण आता तामिळनाडूच्या राजकारणाने थोडे वेगळे वळण घेतल्याचे दिसते. एखाद्या पक्षाने सत्ता गमावली तरी तो पूर्ण नेस्तनाबूत होताना दिसत नाही. त्यामुळेच अण्णा द्रमूकने जरी सत्ता गमावली असली, तरी पक्षातून राजकीय जान पूर्णपणे गेलेली नाही. किंबहुना अण्णा द्रमूकच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पक्षामध्ये नवी राजकीय जान फुंकण्याची संधी माजी मुख्यमंत्री पलानीसामी आणि माजी उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम हे दोघेही घेताना दिसत आहेत.



पण पलानीसामी काय किंवा ओ. पनीरसेल्वम काय हे दोघेही तामिळनाडूच्या राजकारणात पाय रोवून उभे आहेत हे खरे. पण त्यांच्याकडे अम्मांचा अर्थात जयललितांचा करिष्मा नाही. किंबहुना तो असल्याचा त्यांचा दावा देखील नाही. तामिळनाडू विधानसभेच्या निवडणूकीत हे दोन्ही नेते आपण जयललितांचे अनुयायी आहोत, हे ठळकपणे अधोरेखित करीत होते. त्यांचा वारसा चालवत आहोत, हे आवर्जून सांगत होते. यातून त्यांना थोडेफार राजकीय यश मिळाले ही वस्तुस्थिती आहे. मुख्य म्हणजे ही त्या दोघांनाही मान्य आहे.

त्यामुळेच आज अण्णा द्रमूक आपल्या ५० व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना अम्मांच्या सावलीतच उभा असल्याचे दिसत आहे. किंबहुना ही अम्मांची सावलीच आपल्याला तामिळनाडूच्या राजकारणात पुन्हा उभे करणार असल्याची अण्णा द्रमूकच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची खात्री आहे. म्हणूनच सेलिब्रेशनच्या सर्व प्रकारांमध्ये अम्मा झळकताना दिसत आहेत.

तामिळनाडूच्या विविध शहरांमध्ये आणि गावांमध्ये चित्ररथांवर एमजीआर आणि जयललितांच्या सिनेमांची हिट गाणी वाजवून विविध कलाकार त्यांच्या नकला सादर करताना दिसत आहेत. एमजीआर, अम्मांची मोठमोठी तामिळनाडू स्टाइलची पोस्टर्स झळतकत आहेत. सत्ता गमावली तरी एमजीआर आणि अम्मांनी आपली प्रतिमा गमावली नाही, हेच अण्णा द्रमूकचे नेते पक्षाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त तामिळ जनतेच्या मनावर ठसवताना दिसत आहेत.

Even after losing power in Tamil Nadu, Anna DMK’s golden jubilee celebration in the shadow of Amma, but also in search of a charismatic leader of the party !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात