विशेष प्रतिनिधी
रायगड: रायगड जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून खासदार सुनील तटकरे यांच्यावर सातत्याने टीका होत असतानाच, राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध राजकीय मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. आमदार महेंद्र दळवी यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना तटकरे यांनी उपरोधिक शैलीत म्हटले की, इतकं प्रचंड बौद्धिक ज्ञान ऐकल्यानंतर माझ्यासारख्या पामराने काय बोलावं. तसेच, रायगडच्या राजकारणात तुमचा अभिमन्यू झाला आहे का, या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी मिश्किलपणे उत्तर दिले की, माझा अभिमन्यू झाला असेल, तर मी चक्रव्यूह भेदण्याचा विचार करेन.
गडचिरोलीत ‘जनजातीय गौरव दिवसा’चा भव्य सोहळा; गडचिरोली 100 टक्के नक्षलमुक्त होऊन ‘स्टील सिटी’ म्हणून पुढे येत आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
रायगडमध्ये राष्ट्रवादीचे अस्तित्व आणि एनडीएमधील भूमिका कायम राहणार
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याच्या प्रश्नावर बोलताना सुनील तटकरे यांनी सांगितले की, अशा काही प्रवेशांमुळे पक्ष कमकुवत होणार नाही आणि त्यावरून संपूर्ण पक्षाच्या ताकदीचे मूल्यमापन करता येणार नाही. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थान कालही होते, आजही आहे आणि उद्याही कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासोबतच राष्ट्रीय स्तरावरील आघाडीबाबत भूमिका स्पष्ट करताना तटकरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सहभागी आहे आणि राज्यात महायुतीचा घटक म्हणून आमचा पक्ष यापुढेही काम करत राहील; आमच्या या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही.
अजितदादा हयात असते, तर 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण झाले असते
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर भाष्य करताना सुनील तटकरे यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला. शरद पवार यांची प्रकृती ठीक नसताना त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेव्हा प्रफुल्ल पटेल त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्या वेळी विलीनीकरणाबाबत विचारले असता हा विषय संपला असल्याचे आपण सांगितले होते; मात्र अजित पवार हयात असते, तर 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण झाले असते, या विधानाचा तटकरे यांनी पुनरुच्चार केला. त्या वेळी तारखा का सांगितल्या नव्हत्या आणि आता का सांगितल्या, यामागील राजकीय कारण योग्य वेळी उघड करू, असेही ते म्हणाले. खासदार सुप्रिया सुळे यांनीही विलीनीकरणाचा विषय संपल्याचे म्हटले असून, आमच्या पक्षाच्या दृष्टीनेही हा विषय आता पूर्णपणे संपला असल्याचे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App