बीड बसस्थानकातील असुविधांवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक संतापले

प्रसाधनगृहे, पाणी आणि वाचनालयाची अवस्था सुधारण्याचे निर्देश Pratap Sarnaik 

विशेष प्रतिनिधी

बीड : बीड मध्यवर्ती बसस्थानकातील अस्वच्छता आणि सुविधांच्या दुरवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी बसस्थानकाला भेट देऊन विविध सुविधांची पाहणी केली. यावेळी प्रसाधनगृहे, चालक-वाहक विश्रांतीगृह, उपाहारगृह आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधांमधील त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्या. यावर नाराजी व्यक्त करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले.

बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा मिळणे आवश्यक आहे. एसटी महामंडळाची ही प्राथमिक जबाबदारी असून, प्रवाशांना चांगला अनुभव मिळेल याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी. त्याचबरोबर दिवसभर प्रवाशांच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या चालक आणि वाहकांनाही विश्रांतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सुरू केलेल्या वाचनालयाची दुरवस्था

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आलेल्या मोफत वाचनालयाचीही मंत्री सरनाईक यांनी पाहणी केली. मात्र, वाचनालयाची झालेली दुरवस्था पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वाचनालयाची अशी अवस्था असणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी ते तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या. प्रवाशांसह स्थानिक नागरिकांनाही या वाचनालयाचा लाभ घेता यावा, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

सुविधा कागदावर नको, प्रत्यक्षात दिसायला हव्यात!

बसस्थानकातील सुविधा केवळ कागदोपत्री न राहता त्यांचा प्रत्यक्ष लाभ प्रवाशांना मिळाला पाहिजे, असे मंत्री सरनाईक यांनी यावेळी बजावले. बसस्थानकाची नियमित स्वच्छता, सुविधांची देखभाल आणि सेवेचा दर्जा यावर अधिकाऱ्यांनी काटेकोर लक्ष ठेवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या पाहणीमुळे बीड बसस्थानकातील प्रलंबित सुविधांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून, आता संबंधित अधिकारी किती तत्परतेने कार्यवाही करतात, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Transport Minister Pratap Sarnaik expresses anger over the lack of facilities at the Beed bus stand;

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात