महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनसेचा दीपोत्सव रद्द; राज ठाकरेंची घोषणा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागांत निर्माण झालेली भीषण दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाचा मनसेचा भव्य दीपोत्सव साजरा न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्यांनी या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली.

महाराष्ट्र सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असून, ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांसमोर पाण्याचे गंभीर संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा करणे मनाला पटत नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

राज ठाकरे म्हणाले, “यावर्षी दीपोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्रात आलेला आणि येऊ घातलेला भयानक दुष्काळ. महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर असा उत्सव साजरा व्हावा, असे मनाला पटले नाही.”



ज्यातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र आज एका विचित्र अवस्थेतून जात आहे. अनेक ग्रामीण भागांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, आगामी काळात दुष्काळाची तीव्रता आणखी वाढण्याची भीती आहे.

मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून दरवर्षी भव्य दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. आकर्षक विद्युत रोषणाई आणि विविध सजावटीमुळे हा उत्सव मुंबईकरांसाठी विशेष आकर्षण ठरतो. मात्र, यंदा राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन भव्य रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज ठाकरे यांच्या या निर्णयामुळे यंदाचा मनसेचा दीपोत्सव नेहमीच्या भव्य स्वरूपात साजरा होणार नसून, साध्या पद्धतीने दिवाळीचा उत्सव साजरा करण्यावर भर दिला जाणार आहे.

Raj Thackeray cancels MNS Deepotsav amid Maharashtra drought crisis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात