चीनला टक्कर देण्यासाठी भारताची मोठी झेप; वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअर ठरणार गेमचेंजर – देवेंद्र फडणवीस

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारताच्या लॉजिस्टिक क्षेत्राला नवी दिशा देणारा वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअर देशाच्या आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे मालवाहतुकीचा खर्च कमी होऊन भारताला जागतिक सप्लाय चेनमध्ये अधिक सक्षम स्थान मिळेल. भविष्यात किफायतशीर मालवाहतुकीच्या क्षेत्रात भारत चीनला टक्कर देऊ शकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअरच्या जेएनपीटी ते न्यू उंबरगाव या महत्त्वाच्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

महाराष्ट्रातून १७८ किलोमीटरचा मार्ग

दादरी, उत्तर प्रदेश ते जेएनपीटी असा हा महत्त्वाकांक्षी फ्रेट कॉरिडोअर विकसित करण्यात येत आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमधून सुमारे १,५०० किलोमीटरचा रेल्वेमार्ग या प्रकल्पाचा भाग आहे.

यातील महाराष्ट्रातून जाणारा सुमारे १७८ किलोमीटरचा टप्पा महत्त्वाचा असून, त्यासाठी राज्यात सुमारे १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. संपूर्ण वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअर प्रकल्पाचा खर्च सुमारे १ लाख ३० हजार कोटी रुपये असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

दलदलीच्या आणि डोंगराळ भागात मोठे इंजिनिअरिंग आव्हान

न्यू उंबरगाव ते जेएनपीटी हा प्रकल्पातील महत्त्वाचा ‘मिसिंग लिंक’ होता. पालघर, वसई, वैतरणा आणि उल्हास नदी परिसरातील दलदलीचा भाग तसेच डोंगराळ भूप्रदेशामुळे या मार्गाचे बांधकाम मोठे आव्हानात्मक ठरले.

या मार्गावर डबल-डेकर कंटेनरची वाहतूक लक्षात घेऊन आवश्यक उंचीची संरचना उभारली जात आहे. डोंगराळ भागात बोगदे, तसेच विविध फ्लायओव्हर आणि गर्डर उभारण्याचे काम केले जात आहे.

कळंबोली येथे सुरू असलेला सुमारे ११० मीटर लांबीचा आणि १,५०० टन वजनाचा फ्लायओव्हर गर्डर रेल्वे वाहतूक खंडित न करता उभारणे हे अभियांत्रिकीच्या दृष्टीने मोठे आव्हान असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.

मालवाहतुकीचा खर्च कमी होणार

भारताला जागतिक सप्लाय चेनचा महत्त्वाचा भाग बनवायचे असेल तर लॉजिस्टिक खर्च कमी करणे आवश्यक आहे. भारतातील लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट कॉस्ट पूर्वी सुमारे १४ टक्के होती, तर चीनमध्ये ती सुमारे ७ टक्के होती. गेल्या दशकात भारताने हा खर्च सुमारे १० टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.

वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर लॉजिस्टिक खर्च ७ टक्क्यांपेक्षा खाली आणता येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. यामुळे भारत जागतिक सप्लाय चेनचे प्रमुख केंद्र बनण्यास मदत होईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असेही त्यांनी सांगितले.

जेएनपीटीनंतर वाढवण बंदरामुळे महाराष्ट्राची ताकद वाढणार

उरण येथील जेएनपीटी बंदर सध्या देशातील कंटेनर वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. देशातील सुमारे ५५ टक्के कंटेनर ट्रॅफिक जेएनपीटीमार्फत होत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

येत्या काळात जेएनपीटीची क्षमता आणखी वाढणार असून, २०२९-३० पर्यंत बंदराची क्षमता एक दशलक्ष TEU पेक्षा अधिक होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर विकसित होत असलेले वाढवण बंदर जेएनपीटीच्या तुलनेत सुमारे तीनपट मोठे असणार आहे.

वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअर, जेएनपीटी आणि वाढवण बंदर यामुळे महाराष्ट्राची समुद्री आणि लॉजिस्टिक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून, राज्यात ‘मेरिटाइम पॉवर’ निर्माण होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

India’s big leap to compete with China

 

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात